शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांच्या जीवाचे मोलच नाही

By admin | Updated: July 26, 2015 01:58 IST

रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, शहरवासीयांत मात्र खदखदतोय रोष

गोंदिया : अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने शहरात कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध तर कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. उघड्यावर पडून असलेले हे खड्डे मात्र आता अपघातांचे जनक ठरत असून या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडत आहेत. मात्र या सर्व प्रकारांकडे पालिकेचे सपशेल दुर्लक्ष दिसून येत आहे. या खड्ड्यांवर झाकण टाकणे किंवा त्यांना बुजविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र पालिका यातही कमकुवत ठरत आहे. यातून मात्र पालिकेला शहरवासीयांच्या जीवाची काहीच घेणे देणे नसून त्यांना लोकांच्या जीवाचे काही मोलच नसल्याचे आता शहरवासी बोलत आहेत. शहरातील अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांच्या मधोमध किंवा रस्त्यांच्या कडेला उघडे खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. या खड्ड्यांद्वारे नाल्यांची सफाई केली जाते. मात्र सफाई झाल्यानंतर या खड्यांवर लगेच झाकण लावून त्यांना बंद करणे हीसुद्धा पालिकेची जबाबदारी आहे. जेणेकरून या खड्यांत पडून किंवा खड्ड्यांमुळे अपघात घडू नये. मात्र गोंदिया शहरातील स्थिती या विपरीत आहे. शहरात सोडण्यात आलेले खड्डे उघडेच दिसून येत आहेत. तर या खड्ड्यांवर त्यांचे झाकण लावण्याचे साधे सौजन्य दाखविण्यासाठी पालिकेकडे वेळ नसल्याचे दिसते. एरवी ठीक आहे, मात्र सध्या पावसाळा सुरू आहे. शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचते. पावसाच्या पाण्यात हे खड्डे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिसत नाही. अशात हा प्रकार एखाद्याच्या अंगलट येऊ शकतो व या खड्ड्यांमुळे कित्येक अपघातही घडले आहेत. मात्र पालिका निद्रिीस्त अवस्थेत असल्याने खड्डे तसेच उघड्यावर पडून आहेत. यातून पालिका या खड्ड्यांत अपघात घडून लोकांच्या जीवावर बेतण्याची वाट असावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)पालिकेला केल्या कित्येकदा तक्रारीशहरातील नगर परिषद कार्यालयाशेजारी असलेल्या शारदा वाचनालय समोरच मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. यामुळे येथील दुकानदार व आॅटो चालकांना विचारले असता त्यांनी या खड्ड्याला बंद करण्यासाठी कित्येकदा पालिकेला तक्रार केली असल्याचे सांगीतले. मात्र स्थिती आहे तीच आहे. अशात पालिका डोळ्यावर पट्टी व तोंडावर बोट धरून बसल्याचे वाटत असल्याचे बोलत होते. शहरवासीयांत रोष व्याप्तशहरातील रस्त्यांची स्थिती, कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था, डासांचा वाढता प्रकोप त्यात अपघातांना जनक ठरणारे हे खड्डे अशा नानाविध समस्यांवर पालिका काहीच करीत नसल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. शहरातील गचाळ वातावरणामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असल्याचे नागरिक बोलतात. नागरिकांत आतल्या आत पालिका प्रशासन व नगरसेवकांना घेऊन रोष निर्माण आहे. मात्र याचा स्फोट भविष्यात कधीही होणार यात शंका नाही. पदाधिकारीही गप्प बसून नगर परिषद उपाध्यक्षांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देत या खड्यांवर झाकण बसवून घेण्याची गरज आहे. मात्र या दृष्टीने त्यांच्याकडून काहीच करण्यात आले नसल्याचे समजते. सफाईनंतर कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांवर झाकण बसविण्याचे त्यांनी निर्देश देणे अपेक्षीत आहे. मात्र येथील स्वच्छता विभाग किती तत्परतेने काम करतो हे देखील शहरवासी चांगल्याने जाणून आहेत.