शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेल्या ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३८ रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे तर २१ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. आतापर्यंत चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर २० रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यादरम्यान म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले ३८ तर संशयित २१ रुग्ण आढळले. यात ६९५ मधुमेह रुग्णांचा समावेश होता. याच रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहे. आरोग्य विभागाने संशयित रुग्णांना वेळीच उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजारांवर कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे आता आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांची तपासणी करीत आहे. त्यातच आता म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेले रुग्ण पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे.

...........

ही आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे

म्युकरमायकोसिस नावाची काळी बुरशी जमिनीत खतांमध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांमध्ये तसेच हवेत अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाकात त्रास होणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दात हलणे, रक्ताची उलटी ही या आजाराची लक्षणे आहेत.

............

ही घ्या काळजी

रक्तातील साखरेची एचबीआयसीची चाचणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी याचे निरीक्षण, स्टिराॅइडचा अतिवापर टाळा, स्वत:च्या मनाने कुठलेही औषध घेऊ नका, घरी ऑक्सिजनचा वापर करीत असला तरी योग्य ती काळजी घ्या, निर्जंतुक पाण्याचा वापर करा, अँटिफंगलचा औषधांचा वापर करा, डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत राहा.

...........

कोट

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत १६ कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ३८ रुग्ण तर २१ संशयित रुग्ण आढळले. यापैकी काही रुग्णांना नागपूर येथे रेफर केले, तर काही रुग्णांवर गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

- डाॅ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी