शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथकाला चकमा देत दुसºयास दिशेने पळून गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी काचेवानी परिसरात घडली.मुरूमाची चोरी करून ...

ठळक मुद्देगौण खनिजांची चोरी : गंगाझरी पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथकाला चकमा देत दुसºयास दिशेने पळून गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी काचेवानी परिसरात घडली.मुरूमाची चोरी करून अवैध वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाची तक्रार नोंदविण्यास गंगाझरी पोलिसांनी नकार दिला. अशी माहिती संबंधित तलाठ्याने तिरोडा तहसीलदार यांना सांगितले. तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनात अवैध गौण खनिज चोरी व वाहतूक करणाºयांवर आळा घालण्यासाठी पथक तयार करण्यात आले. पथक प्रमुख नायक तहसीलदार नरवडे, साजा-५ बघोलीचे तलाठी जे.पी. उईके, साजा-७ बोदाचे तलाठी जी.बी. हटवार व साजा-७ करटी बु.चे तलाठी एम.एस. गेडाम हे गस्त घालत असताना बोराटोला येथील तलावात मुरूम खोदून वाहनात भरले जात होते.पथकाने तेथे जावून ट्रॅक्टर चालक व मजुरांना खोदकाम व वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र त्यांना परवाना नसल्याचे सांगण्यात आले. ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/जी-५८४२ व ट्राली क्रमांक एमएच ३५/एफ-२७११ च्या मालकाला बोलाविण्यात आले. दंड व रॉयल्टी मिळून चार हजार ९०० रूपये भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे ट्रॅक्टरमालक अमोल मधूकर गावंडे याने नकार दिला.तसेच ट्रॅक्टरसह मालक गावंडे, चालक सहदेव शेंडे, घनश्याम नेवारे, किशोर उईके, रूद्रराज पटले व खुशाल नंदूरकर यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित होण्यास नायब तहसीलदारांनी सांगितले. मात्र अमोल गावंडे व सर्वांनी संगनमत करून गंगाझरी पोलीस ठाण्यात न जात करटी बु.च्या दिशेने पसार झाले. ही घटना ३ आॅगस्टला सकाळी ११.१५ वाजता घडली. पथक प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाची तक्रार साजा-५ चे तलाठी जे.पी. उईके यांनी पथकासह गंगाझरी पोलीस ठाण्यात जावून अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात सहा आरोपींविरूद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र एपीआय मेश्राम यांनी आरोपींना आणा तेव्हाच तक्रार नोंदवू अन्यथा तक्रार नोंदविणार नाही, अशी भूमिका घेतल्याचा आरोप आहे.याबाबत लगेच तलाठी उईके यांनी पोलीस तक्रार घेत नसल्याची माहिती तहसीलदारांकडे केली. त्या तक्रारीनुसार ठाणेदार शीतल यादव व एपीआय मेश्राम यांनी १२.३० ते ४ वाजतापर्यंत थांबवून ठेवले. शेवटी ट्रॅक्टर व चोरी गेलेला मुरूम घेवून या, तेव्हाच गुन्हा नोंद करू,असे सांगून तक्रार नोंदविले नसल्याचे सांगितले.पोलिसांना तक्रार परत करता येत नाहीफिर्यादी पोलिसात तक्रार नोंदविण्यास गेल्यास कोणत्याही परिस्थितीत तक्रार नोंदविणे भाग आहे, असे निर्देश आहेत. चौकशीअंती गुन्हा नोंद करणे किंवा न करणे, हे तपासाअंती ठरविले जाते. परंतु तक्रार घ्यावीच लागते. मात्र पोलिसांनी तक्रार परत करण्यामागील कारण अनुत्तरीत आहे. आता तहसीलदार संजय रामटेके त्या ट्रॅक्टर मालक व तक्रार न नोंदविणाºया पोलिसांबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.