शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 21:34 IST

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील ३४८ गावांमध्ये गुलाबी थंडीत  हळूहळू राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत. त्यातच या निवडणुकीत  सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. तर या निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायत आणि पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी पुढील निवडणुकांची पायवाट मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून प्रभावी अशा महिला व पुरुष उमेदवारांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढू, असे म्हणत थेट जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. एकूणच ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील ३४८ गावांतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या 

२३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून, २० डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी  करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंबंधीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, निवडणूक विभागाचे याकडे लक्ष राहणार आहे.

सरपंचाची निवड होणार थेटn ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४८ ग्रा. पं.तील सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम- २८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे.- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. - ५ डिसेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.- ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तर याचदिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.- १८ डिसेंबर मतदान - २० डिसेंबरला मतमोजणी तसेच निकाल घोषित करण्यात येईल.- २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्यांच्या वाढल्या गाठीभेटी ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली, तरी गाव पातळीवर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात. हे पॅनल विविध राजकीय पक्षांचे असतात. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गावपातळीवर  गाठीभेटी आणि बैठका वाढल्याचे चित्र आहे. 

अग्रवाल, रहांगडाले, जैन लागले कामाला- स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबीज करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक तिरोडा तालुक्यात व गोंदिया तालुक्यात ७० ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. तिरोडा विधानसभेचे आ. विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे निवडणुका होऊ घातलेल्या भागात सक्रिय होऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक