शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक केले जप्त 

By नरेश रहिले | Updated: May 3, 2023 18:33 IST

Gondia News न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

नरेश रहिलेगोंदिया: न्यायालयाने आदेश देऊन तब्बल दिड वर्ष झाले. परंतु न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार ३ मे रोजी गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील सेवानिवृत्त शिक्षक निलकंठ धानूजी भुते यांच्या १५ वर्षाच्या सेवेचा कालावधी ग्राह्य धरून त्याच्या वेतनापोटी त्यांना २० लाख रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता माध्यमिक शिक्षणाधिकारी आपला मनमर्जी कारभार चालवित होते. शिक्षक निलकंठ भुते यांनी १९८४ ते १९८९ या काळात नॅशनल ज्युनियर कॉलेज परसवाडा येथे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. त्यानंतर १९९१ ते १९९७ या काळात भुषणराव पाटील तिल्ली मोहगाव या शाळेत ते कार्यरत होते. परंतु संस्थेच्या अंतर्गत कलहामुळे ती शाळा बंद पडली. परंतु शासनाने त्यांचे समायोजन केले नाही. त्यामुळे त्या शाळेतील सर्व शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते. त्या प्रकरणाचा निकाल सन २०१२ मध्य लागला. त्यांना सेवेत सामावून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यावर त्यांना ६ मे २०१३ ला गोंदिया शहरातील मनोहर म्युनिसीपल हायस्कूल शाळेत नियुक्ती देण्यात आली. त्यांची वयोमानानुसार ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्ती झाली. त्यांची मधातल्या काळातील सेवा ग्राह्य धरण्यात यावे यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची मागणी न्यायालयाने ऐकूण त्यांना त्या सेवेचे २० लाख रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२१ ला दिले होते. परंतु गोंदियाचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या कार्यालयाची जप्ती करण्यात आली आहे.१५ वर्षाचा मूळ वेतन होतो ३४ लाख

निलकंठ भुते यांचा १५ वर्षाचा कालावधी न्यायालयाने ग्राह्य धरला. या १५ वर्षाचे वेतन ३४ लाख ११ हजार ४ रूपये होते. न्यायालयाने २० लाख रूपये देण्यात यावे असे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला न जुमानणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी दिघोरे यांची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्यात आले.

८ टक्के व्याजाने द्यावे लागेल व्याज२० लाख रूपये तीन महिन्याच्या आत द्यावे अन्यथा ८ टक्के व्याजदराने ती रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तीन महिने सोडा दिड वर्ष लोटूनही न्यायालयाचे न ऐकणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रमुख बेलीफ डी.टी. शहारे, बेलीफ डी.बी. नागपुरेी यांनी केली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारCourtन्यायालय