शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षपद निवडणुकीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 05:00 IST

सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के आरक्षण रद्द केले. या विरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. तसेच मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दीड महिन्याचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला नाही. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराचा सुध्दा वापर करता येत नसल्याने त्यांचा संताप वाढत आहे. तर निवडणुकीचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के आरक्षण रद्द केले. या विरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. तसेच मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली आहे. तर अध्यक्ष आणि सभापतिपदाचे आरक्षणसुध्दा यापूर्वी जाहीर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्याच आरक्षणानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने मागील दीड महिन्यापासून निर्णय न कळविल्याने अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य अधिकाराविना आहेत. 

सत्ता स्थापनेचा दावा नाही - जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आरक्षणाचा निर्णय झाला नसल्याने अद्यापही कोणत्याही पक्षाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच यावर निर्णय घेऊ असे सर्वच पक्षांचे नेते सांगत आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. पण ग्रामविकास विभागाने अद्यापही अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा निर्णय न कळविल्याने या निवडणुका लांबल्या आहेत. यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असून ही बाब योग्य नाही.- केशव मानकर, भाजप जिल्हाध्यक्ष

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसात अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. पण ओबीसी आरक्षणाच्या याचिकेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र आता यावर ग्रामविकास विभागाने त्वरित निर्णय घ्यावा.- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरात लवकर ग्रामविकास विकास विभागाने जाहीर करावा.- दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

नियम काय म्हणतो - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात नोंद करण्यासाठी जाहीर करतात. ज्या तारखेला ही नावे जाहीर केली जातात, त्यानंतर महिनाभराचा कालावधी या अध्यक्ष आणि सभापतींची निवडणूक घेणे गरजेेचे आहे; पण याला दीड महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही.सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे चुकीचे - कोरोनामुळे आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन वर्षे लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर निवडणुका झाल्या, मात्र आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही निवडणूक गेल्या दीड महिन्यापासून लांबणीवर पडली आहे. सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे.