शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेगाव-गराडा रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:55 IST

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : अपघातांच्या संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.चुरडी ते गराडा या रस्त्याचे मागील दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्पावधीत रस्ता उखडल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गावकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील गावकºयांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत दोन वर्षापूर्वी चुरडी -काशीघाट नाल्यापासून ते गराडापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु असताना अनेकांनी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर सवाल उपस्थित केला होता. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.ठाणेगाव ते गराडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. तर तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्प असल्याने व तिरोड्याला जाणारा हाच मुख्य मार्ग आहे. या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी तर गावकरी विविध कामासाठी तिरोडा तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे या मार्गावर अनेक अपघात सुध्दा झाले आहे. पण, यानंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतलेली नाही.त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ता बांधकामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.