शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसाद वितरणासाठी मंडळांची नोंदणीकडे पाठ

By admin | Updated: September 19, 2015 02:58 IST

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसाद वितरण केला जातो.

‘एफडीए’कडे नाही मनुष्यबळ : अनुचित प्रकार घडल्यास मंडळावर कारवाईगोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसाद वितरण केला जातो. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी अद्याप तरी प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात एकाही मंडळाकडून त्यासंदर्भात अर्ज आलेला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महाप्रसादासाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असले तरी नोंदणी न करता महाप्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांवर कारवाईसाठी मात्र काहीच निकष नसल्याचेही कळते. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केला जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हात वर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. अशावेळी महाप्रसाद खाण्यायोग्य आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असते. मात्र या विभागाकडे गोंदियात मनुष्यबळच नसल्यामुळे की काय त्यांच्याकडूनही याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.आश्चर्याची बाब अशी की, जिल्ह्याचे तर सोडाच मात्र शहरातील १०० च्या वर गणेश मंडळांमधील एकाही मंडळाकडून शुक्रवारपर्यंत ‘एफडीए’ च्या कार्यालयात महाप्रसाद वितरण नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला नव्हता. वास्तविक प्रशासनाकडे नोंदणी न करता कित्येक मंडळांकडून महाप्रसाद वितरण केले जातात. अशात प्रशासनाकडून मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नोंदणी न करता महाप्रसाद वितरण करणाऱ्यांवर कारवाईसाठी काहीच निकष नसल्याने १०० रुपये भरून नोंदणी करायची तरी कशासाठी? असा प्रश्न काही मंडळांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)नोंदणीसाठी काय करावे ?गणेशोत्सव मंडळांना महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधीत गणेश उत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणीची प्रत, मंडळाची यादी, ठरावाची प्रत, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र व जबाबदार पदाधिकाऱ्यांचे दोन फोटो विभागाकडे द्यावयाचे आहे. तसेच महाप्रसाद वितरणासाठी वर्षाला १०० रूपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. मात्र बहुतांश मंडळांना याबाबतची माहितीच नाही. ही माहिती सर्व मंडळांना मिळावी यासाठी सदर विभागाकडूनही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही.