शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

सभापतींचा कार्यकाळ पूर्णत्वाकडे

By admin | Updated: February 20, 2016 02:37 IST

नगर परिषदेच्या सभापतींचा कार्यकाळ येत्या ११ मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे ११ तारखेला विषय समिती सभापतींची निवडणूक घेणे नियमानुसार बंधनकारक आहे.

११ मार्चला निवडणूक : कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्तगोंदिया : नगर परिषदेच्या सभापतींचा कार्यकाळ येत्या ११ मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे ११ तारखेला विषय समिती सभापतींची निवडणूक घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संख्याबळ जास्त असल्याने पालिकेतील विषय समिती सभापतींची पदे यंदाही त्यांच्यात झोळीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेत सत्तापालट होऊन भारतीय जनता पक्षाकडे सत्ता गेली. मात्र निष्काशित करण्यात आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व परत आल्याने संख्याबळाची आकडेवारी बदलून गेली. परिणामी अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे असले तरी विषय समितींचे सभापतीपद मात्र आजही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. आता भारतीय जनता पक्षाचे शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने भाजपचा एक सदस्य कमी झाला असून त्यांची आकडेवारी १६ वरून १५ वर आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ११, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ६, लोकतांत्रीक गटबंधनचे २, शिवसेना ३ व अपक्ष दोन अशी सदस्य पालिकेत आहे. यामुळेच पालिकेत सभापतीपद राष्ट्रवादी व कॉंगे्रसकडे आहे. मागील वर्षी ११ मार्च रोजी सभापती पदासांठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानुसार यंदा सभापतींचा कार्यकाळ ११ मार्च रोजी संपत असून नियमानुसार याचदिवशी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे येत्या ११ तारखेला सभापतीपदांसाठी निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. निवडणूक जवळ आल्याने इच्छूकांची सेटींग आतापासूनच सुरू झाली असेल. याबाबतचे चित्र निवडणुकीच्या वेळीच माहिती पडणार. मात्र सर्वांच्या नजरा आता सभापतीपदासाठीच्या निवडणुकीकडे लागले आहे. (शहर प्रतिनिधी)बांधकाम काँग्रेसकडेच?पालिकेत आजघडीला बांधकाम सभापती राकेश ठाकूर, पाणी पुरवठा सभापती निर्मला मिश्रा, शिक्षण सभापती विद्या बानेवार, नगररचना सभापती चंद्रकला देशमुख तर महिला व बाल कल्याण सभापती सुशिला भालेराव या आहेत. पालिकेतील सदस्य संख्येच्या आधाराकडे बघता यंदाही सभापतीपद त्यांच्याचकडे जाणार असल्याचे दिसते. मात्र राजकारणात कधी काय होणार हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी सभागृहात काय स्थिती असते यावरच संपूर्ण परिस्थिती अवलंबून राहणार आहे. यात बांधकाम विभाग मात्र कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे बोलले जाते.