शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका

By admin | Updated: May 15, 2014 01:28 IST

रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी ..

गोंदिया : रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करावा लागतो. जंगलातून तेंदूपाने संकलन करणार्‍या मजुरांना वन्यप्राण्यांपासून मोठा धोका आहे.यामुळे विमा सरंक्षण देण्याची मागणी होत आहे.मजुरांना विमा संरक्षण नसल्यामुळे काही घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मजुरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाकडे पाहिले जाते. खेड्यापाड्यातील घराघरात लहानांपासून वृध्दांपर्यंत संपूर्ण कुटूंब या व्यवसायात गुंतलेले असतात. अगदी पहाटेला जंगलात जाऊन वन्यप्राण्यांशी सामना करीत तेंदूपत्ता गोळा करतात. परंतु त्यांना मिळत असलेल्या अल्प मोबदल्यात आपला जीव धोक्यात घालत असल्यामुळे त्यांच्या हाती धुपाटणे मिळत आहे. अर्जुनी/मोरगाव व सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलातून हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.या व्यवसायातून कंत्राटदार व मालक मालदार झाले आहेत. तर मजूर मात्र अल्प उत्पन्नातून केविलवाणे जीवन जगण्याकरिता धडपड करीत आहेत. तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजुरांचे शोषण मात्र संपलेले नाही. या तालुक्यात अनेक वर्षापासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय अविरत सुरू आहे.यासाठी प्रत्येक वन कार्यालयात तेंदूपत्ता संकलन विभाग असतो.तेंदूपत्ता संकलनाला मे महिन्यात सुरूवात होत असते. १५ते २0 दिवसाचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी तेंदूपत्ता युनिटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येते.त्यानंतर लिलाव होतो. त्यानंतर जंगलामध्ये बालमजुरांना घेऊन तेंदूपत्ता झाडाचे खुंटकटाईचे काम केल्या जाते. मे महिन्यांमध्ये प्रत्यक्ष तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात केले जाते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतात राबराब राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर उन्हात तेंदूपत्ता तोडायच्या कामात स्वत:ला गुंतवून चार पैसे मिळवायचे, असा नित्यक्रमच ठरला आहे. उन्हाळ्यात हाताला दुसरे काम नसल्यामुळे चार पैसे हातात मिळावे म्हणून जीवाचे रान केले जाते. अनेक वर्षापासून अगदी पिढीजात हे मजुरीचे काम करणार्‍यांची आर्थिक स्थिती अगदी बेताची आहे. (प्रतिनिधी)