शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निविदा अडली, मात्र सोलर लाईट लागले

By admin | Updated: June 22, 2017 00:13 IST

तालुक्याच्या ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १४ वा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनियमीतता

ग्रामसेविकेला कारणे दाखवा : पोवारीटोला ग्रामपंचायतचा अजब कारभार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तालुक्याच्या ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १४ वा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनियमीतता करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ग्रासेविका एस.बी. खोब्रागडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवले आहे. निवीदा प्रक्रीया पूर्ण न करताच या गावात सोलर लाईट लावण्यात आल्याचा मुद्दा गाजला आहे. सोलर लाईट खरेदी संदर्भात दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर निविदा सूचना ग्राम पंचायतने प्रकाशीत केली. खरेदी करायच्या साहित्याप्रमाणे अटी दर्शविण्यात आले नाही. निविदा १० सौर ऊर्जा लाईट करीता मागविण्यात आल्या. निविदा ५० हजार रुपये पेक्षा जास्त रकमेच्या होत्या. दोन निवीदा असल्यामुळे फेरनिविदा काढणे आवश्यक होते. परंतु तसे केले नाही सदर काम ग्रामसेवक, सरपंच यांनी नियमबाह्य करून कामात अनियमितता केल्याचे चौकशीत म्हटले आहे. महाराष्ट्र जिल्हा सेवा शिस्त अपिल नियम १९६४ व जिल्हा सेवा वर्तणुक नियम १९६७ चे उलंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राम पंचायतने हातपंप साहित्य खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याकरिता ७ दिवस देणे अपेक्षीत होते परंतु ग्राम पंचायतने १८ दिवसाची मुदत दिली होती. निविदा न काढता मोगम स्वरुपाचे निविदा काढून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. सामान्य निधीमधून रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुझविण्याकरिता माँ दुर्गा सिमेंट अ‍ॅन्ड लोहा एजेन्सी यांच्यामार्फत प्रमाणक क्रमांक ४० व प्रमाणक क्रमांक ४९ अन्वये एकूण १० ट्राली मुरुम व प्रमाणक क्रमांक ७६ प्रमाणे २० ट्राली माती टाकल्याचे दिसून आले. कामावर माती व मुरुम पसरविणाऱ्या मजुरांना नमूना १९ प्रमाणे ५ हजार रुपये देण्यात आले आहे. ग्राम पंचायतचे लेखा संहितेप्रमाणे बांधील पुस्तकात ठेवणे बंधनकारक आहे. परंतु ग्राम पंचायतचे दस्ताऐवजांच्या तपासणीअंती मासीक सभा इतिवृत्त हे बांधील स्वरुपाचे नसून प्रत्येक सभेकरिता संगणीकृत प्रत काढून इतिवृत्त लिहीले असल्याचे दिसून आले. यामुळे सभेत इतिवृत्तात बदल करणे किंवा दुसरे ठराव सभेच्या परवानगी न घेता लिहिण्यात आले असेल, आपण या कामात ग्रासेविकेने निष्काळजीपणा केला आहे. ग्राम पंचायत पोवारीटोला येथे १६ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी भेट दिली असता सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे घर कर व पाणी कर वसूली ४० टक्के केले असल्याचे आढळले. परंतु शासन परिपत्रक क्र.पीआरसी/१०७६/२३३५/२३, ३१ जानेवारी १९७७ अन्वये ७० टक्के कर वसूली करणे बंधनकाक आहे. परंतु पंचायत राज कमिटीने दिलेल्या निर्देशांची व शासन परिपत्रकाची अवहेलना ग्रामसेविका करीत आहे. घर कराची रक्कम खिशात पोवारीटोला ग्रामपंचायतचे सन २०१६-१७ चे सामान्य रोकड वही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासले असता खातेदारांना दिलेली पावती व रोकड वहीत नोंदविलेली रक्कम यात तफावत आढळली. नमूना १० चे पावती क्रमांक २२ सदाशिव मेहतर मारबदे यांच्या नावाने ३४० रुपयाची पावती कापण्यात आली व रोकड वहीत फुलेश्वरी मारबदे यांच्या नावाने २९० रुपये लिहण्यात आले. पावती क्रमांक ९१ परमानंद कनिलाल शहारे यांच्या नावे ७३० रुपये नोंदविण्यात आहे. परंतु रोकड वहीत कनिलला शहारे यांच्या नावे २९५ रुपये लिहले आहे. पावती क्रमांक २१ रामकृष्ण लटारु ब्राम्हणकर यांच्या नावे ९०१ रूपये आहेत. परंतु रोकड वहीत कमी नोंदवून अफरातफर केली आहे. ग्राम निधीत घर कराची ज्यादा रकमेची पावती कापून प्रत्यक्ष निधीत कमी रक्कम जमा करुन पैश्याची अफरातफर केली आहे. मुंबई ग्रामपंचायत (ग्रामनिधी अभिरक्षा व गुंतवणूक) नियम १९५९ चे पालन केले नाही त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आहे.