शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दुसऱ्यांदा निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:20 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा कुतुहलाचा विषय असला तरीही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे .....

ठळक मुद्देविशेष सर्वसाधारण सभेचा ठराव : काम करण्यास कुणीही इच्छूक नाही

कपिल केकत ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा कुतुहलाचा विषय असला तरीही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे काढण्यात आलेल्या पहिल्या निविदेतून दिसून येत आहे. परिणामी नगर परिषदेवर दुसºयांदा निविदा काढण्याची पाळी आली आहे.शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीला घरातून निघणे धोकादायक झाले आहे. हे बेवारस कुत्रे कधी कुणाचा चावा घेतील याचा काही नेम नाही. त्यामुळे बेवारस कुत्र्यांना बघूनच शहरवासी घाबरत आहेत. शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. शहरातील वातारवरणाच्या दृष्टीने हा प्रस्ताव योग्य असल्याने सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कुत्र्यांच्या निर्बिजकरणाच्या या कामासाठी नगर परिषद स्वच्छता विभागाने जानेवारी महिन्यात निविदा काढली होती. फेब्रुवारी महिन्यात निविदा उघडण्यात आल्या असता आश्चर्याची व तेवढीच खेदाची बाब अशी की, या निविदेवर कुणीही अर्ज टाकला नाही. यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम होऊ शकले नाही. नगर परिषदेने या विषयावर ठराव घेतला असल्याने तसेच शहरवासीयांच्या हिताचा हा विषय असल्यामुळे स्वच्छता विभागाला हे काम करणे गरजेचे झाले आहे. परिणामी, स्वच्छता विभाग आता पुन्हा दुसºयांदा निविदा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.बेवारस कुत्र्यांनी घेतला होता चावाशहरातील सिव्हील लाईन्स परिसरात दिवाळीच्या काळात बेवारस कुत्रा पागल होऊन त्याने कित्येकांना चावा घेतला होता. अशीच एक घटना त्यानंतरही ही घडल्याची माहिती आहे. कुत्रा पागल होऊन चावा घेत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या जिवालाही धोका होऊ शकतो. यावर नगर परिषद स्वच्छता विभागाकडूनच त्या कुत्र्याला ठार करण्यात आले होते अशी माहिती आहे. ही घटना बघता लवकरात लवकर कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करणे अपेक्षीत आहे. मात्र आता यंदाही कुणी निविदा टाकून पुढे येतो काय हे बघावयचे आहे.