लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील ग्राम शिवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशन कार्डधारकांना नियमानुसार धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तहसीलदारांनी त्या दुकानदाराची चौकशी न करता उलट तक्र ारकर्त्यालाच तुम्ही गावातील शांतता भंग करीत आहात, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत संतोष सतीशहरे, संदीप उके, नामदेव पागोटे यांनी रविवारी (दि.३) केला.शिवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड धारकांना कमी धान्य वाटप करीत असल्याची ओरड आहे. सदर धान्याची काळाबाजारात विक्री केली जात आहेत. याबाबत अनेकदा अन्न पुरवठा विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली मात्र या प्रकरणाची चौकशी करु न कारवाई करण्यात आली नाही.स्वस्त धान्य दुकानदाराला तालुका प्रशासनाचे अभय असल्याने स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमर्जी कारभार सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत संतोष सतीशहरे यांनी केला.तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन स्वस्त धान्य दुकान शिवणी येथील त्याच बचत गटातील महिलांना चालविण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी केली. मात्र तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्याच दुकानदाराला दुकान चालविण्यासाठी दिल्याचा आरोप केला.संबंधित स्वस्त धान्य दुकानदार व अधिकाऱ्यांची शासनाने चौकशी करु न कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन आमदार सहषराम कोरोटे यांना दिले असल्याचे आरोपक र्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तालुक्यातील ग्राम शिवणी येथील स्वस्त धान्य दुकान येथील बचत गटातील सदस्यांनी वितरण प्रणालीवर आक्षेप नोंद करून तक्र ार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत गावात भेट देऊन चौकशी केली. यातील अहवाल सादर करण्यात आले. तर वादग्रस्त बचत गटाचे धान्य दुकान अन्य बचत गटाला देण्यात आले. यात गावातील नागरिकांनी एकमताने सहमती दर्शविली. त्यामुळे सदर निर्णय घेण्यात आला. धान्य वितरण स्थानिक पातळीवर शाळेत करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत केलेले आरोप तथ्यहिन आहे.-दयाराम भोयर, तहसीलदार आमगाव.
स्वस्त धान्य दुकानदाराला तहसीलदारांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST
शिवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड धारकांना कमी धान्य वाटप करीत असल्याची ओरड आहे. सदर धान्याची काळाबाजारात विक्री केली जात आहेत. याबाबत अनेकदा अन्न पुरवठा विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली मात्र या प्रकरणाची चौकशी करु न कारवाई करण्यात आली नाही.
स्वस्त धान्य दुकानदाराला तहसीलदारांचे अभय
ठळक मुद्देपत्रकार परिषदेत आरोप : कारवाई करण्यास टाळटाळ