शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

विमुक्त भटक्या जमातीचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: March 1, 2016 01:08 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी ...

शेकडोंचा सहभाग : विविध मागण्यांसाठी शासनाला साकडेअर्जुनी-मोरगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूरच्या अर्जुनी-मोरगाव शाखेकडून सोमवारी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा श्रीकृष्ण राईस मिल येथून निघून जुने बस स्थानक मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी वक्त्यांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत दिघोरे, शालीकराम भोयर, सदाशिव मेश्राम, नारायण मेश्राम, हिवराज बावणे, काशीराम कोल्हे, गोपाल सोनवाने, प्रभाकर सोनटक्के, कालीदास बावणे यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार बोम्बर्डे यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)या मागण्यांचा समावेशविमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकांमध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतुद करणे, मच्छीमार संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य, मच्छीमारांना २०० दिवस हाताला काम व विकासाच्या योजना लागू करणे, भूमीहिनांना पडिक जमिनी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण, कर्ज व बेघरांसाठी घरकुल योजना लागू करणे, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करणे, एस.सी.,एस.टी.च्या धर्तीवर जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली नाराजीमोर्चेकरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचले त्यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले हे तहसीलदारांच्या केबिनमध्ये बसले होते. मोर्चाते नेतृत्व करणारी मंडळी मंत्री येत आहेत, आपण शांत बसा, असे जमावाला सांगत होती. मात्र पालकमंत्री मोर्चेकऱ्यांना सामोरे न जाता निघून गेले. त्यांच्या सहकार्याने आमचा लढा शासन दरबारी पोहोचविण्याचा मानस होता, असे सांगून मोर्चेकऱ्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.