शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

शिक्षकांना वेठीस धरणाºयांना धडा शिकविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:57 IST

शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणाºया शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देओमप्रकाशसिंह पवार : शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक

ऑनलाईन लोकमत इसापूर : शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणाºया शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद जिल्हा गोंदिया कार्यकारिणीची सभा संत तुकाराम हायस्कूल गोंदिया येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, राष्टÑहित, शिक्षणहित व शिक्षकहित जोपासणारी मराविप ही एकमेव संघटना असून शैक्षणिक हितार्थ कार्य करणे हेच ध्येय. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आले. तेव्हापासून एक ना अनेक जीआर काढून राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला.यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनात खºया अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी शाळांमध्ये ज्या मुलभूत सुविधा आधी पुरविण्याची आवश्यकता आहे. त्यांची पूर्तता न करता ‘हम करो सो कायदा’ असे धोरण राबविले जात आहे. पटसंख्येच्या आधारे शिक्षक संच मान्यता, शिक्षकेत्तर कर्मचारी आकृतीबंध यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाले. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी पद रद्द करण्याचा फतवा काढला. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती शिक्षक अभियोग्यता चाचणी, आॅनलाईन माहिती सादर करने, शाळा डिजीटल लोकवर्गणीतून करने, शालेय पोषण आहार, व शिष्यवृत्ती संबंधिची कार्यवाही, अशैक्षणिक कामे अशा अनेक कारणासाठी शैक्षणिक कामे सोडून शिक्षकांना तासनतास शाळेबाहेर राहावे लागते. शिक्षण विभागातील किती तरी पदे अजूनही रिक्त आहेत. वेतन पथकांची तर व्यथाच आहे. कित्येक वर्षापासून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण होवू शकल्या नाही. याकडे शासनाचे किती लक्ष आहे असा सवाल उपस्थित मान्यवरांनी केला.सभेला नागपूर विभागाचे उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुद्धे, जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे, उपाध्यक्ष विजय मानकर, सहकार्यवाह आतीष ढाले, संघटनमंत्री विरेंद्र राणे, सहसंघटन मंत्री उल्हास तागडे, जी.डी. पटले, कार्यालय मंत्री आनंद बिसेन, कोषाध्यक्ष छत्रपाल बिसेन व अन्य जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन गुणेश्वर फुंडे यांनी केले. आभार छत्रपाल बिसेन यांनी मानले.