शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींच्या भेटीत शिक्षक मद्यधुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 02:08 IST

पंचायत समिती सभापतींनी शाळेत दिलेल्या भेटीत शिक्षक अति मद्यधुंद स्थितीत आढळून आले.

बोरटोला शाळेतील प्रकार : केशोरी पोलीस ठाण्यात केला पंचनामाइसापूर : पंचायत समिती सभापतींनी शाळेत दिलेल्या भेटीत शिक्षक अति मद्यधुंद स्थितीत आढळून आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला (भरनोली) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी (दि.१५) भरदुपारी २.४५ वाजतादरम्यानचा हा प्रकार आहे. यावर त्या शिक्षकाला केशोरी पोलीस ठाण्यात नेवून पंचनामा करण्यात आला. पंचायत समिती यांच्या समवेत अरविंद शिवणकर व त्यांच्या सोबत सहा. गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक गावडे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, विस्तार अधिकारी अनुप भावे, सहायक खंडविकास अधिकारी अंदुलकर यांनी गुरूवारी (दि.१५) दुपारी बोरटोला शाळेला भेट दिली. याभेटीत शाळेतील सहायक शिक्षक डी.एम.लोणारे हे अति मद्यधुंद्य स्थितीत आढळले. विशेष म्हणजे सभापती शिवणकर यांच्या भेटपूर्वी केंद्रप्रमुख वाय.बी.येल्ले यांनी शाळेला भेट दिली होती. मात्र त्यांना शिक्षक लोणारे मद्यधुंद स्थितीत कसे आढळून आले नाही यातून केंद्रप्रमुखच त्यांना पाठीशी घालत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान शिक्षक लोणारे यांना केशोरी पोलीस ठाण्यात नेवून पंचनामा करण्यात आला. यापूर्वी तालुक्यातील राजोली, भरनोली येथील शाळा बंद तर इसापूर येथील प्र. मुख्याध्यापक फुलबांधे हे सुद्धा रस्त्यावर दारू पिऊन झिंगाट करीत असल्याचे आढळून आले होते. तोच काही दिवसानंतर हा प्रकार घडल्याने तालुक्यात झिंगाट शिक्षकांचा पेव तर फुटला नाही ना? असे दिसून येत आहे. गावातील पालकांनी या शिक्षकाचा हा नेहमीचाच प्रकार असून मुलांचे शाळेत जाणे बंद झाले असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सभापतींना सांगितले. एवढेच नव्हे तर हा शिक्षक विचारलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर देऊनही विद्यार्थ्यांना मारझोड करीत असल्याचेही समोर आले आहे. (वार्ताहर)