शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

शिक्षकांच्या मागण्या त्वरित निकाली निघणार

By admin | Updated: October 26, 2016 02:38 IST

जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या व मागण्या प्रलंबित असून त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : शिक्षक समितीची सकारात्मक चर्चा गोंदिया : जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या व मागण्या प्रलंबित असून त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सहविचार सभेतील ठरावानुसार सोमवारी (दि.२४) प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक राहिली असून शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या त्वरीत निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मासिक वेतन एक तारखेला देण्यात यावे, माहे आॅक्टोबर चे वेतन दिवाळी सणापुर्वी देऊन नोव्हेंबरच्या वेतनात महागाई थकबाकी काढण्याची संबंधितांना सुचना देण्यात यावी, प्रलंबित पुरवणी देयके नोव्हेंबरच्या वेतनासोबत शालार्थद्वारे काढण्यात यावे, अंशदायी पेंशनधारक शिक्षकबांधवांचा कपातीचा हिशेब देण्यात यावा, प्रलंबित आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अप्रशिक्षीत शिक्षकांना नियमितचे आदेश तातडीने देण्यात यावे, निवडश्रेणी वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे त्वनित निकाली काढणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत वाटप करण्याची बक्षीस रक्कम त्वरित देण्यात यावी, वाचन भत्ता प्रकरण निकाली काढावे, जी.टी.खाते अद्ययावत करुन पावती वाटप करणे, प्रलंबित असलेला शालेय पोषण आहार मानधन, इंधन व भाजीपाला खर्च दिवाळीपुर्वी देण्यात यावा, पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दुर करणे, एकस्तर पदोन्नतीनुसार व शिक्षक उ.श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना वेतनवाढ देण्यात यावी, हिंदी-मराठी सुट तसेच उच्च परीक्षेला बसण्यासाठी पूर्ण व कार्योत्तर परवानगीची प्रकरणे त्वरित निकाली काढावी, ४ टक्के सादिल शाळा व दुरुस्ती अनुदान त्वरित जमा करण्यासाठी कार्यवाही करावी, सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्तीचे धनादेश त्वरित देण्यात यावे, वैद्यकीय प्रतीपुर्ती प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी कार्यवाही करावी, जास्तीचे खर्च झालेली गणवेश रक्कम शाळांना त्वरित मिळावी, या सर्व मागण्यांना घेऊन शिक्षणाधिकारी नरड यांच्यासोबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. विशेष म्हणजे ही सकारात्मक ठरल व शिक्षणाधिकारी नरड यांनी सर्व प्रश्न व मागण्या तातडीने निकाल काढण्यात येईल असे आश्वासित केले.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, किशोर डोंगरवार, विनोद बडोले, संदीप तिडके, सुरेश कश्यप, एन.बी. बिसेन, सी.आर. पारधी, एस.सी. पारधी, पी.आर. लिल्हारे, प्रदीप रंगारी, संजीव बोपचे, दीपक कापसे, रोशन म्हसकरे, पी.बी. सयाम, विशाल कच्छनाय, ए.टी. टेंभुर्णीकर, तेजराम नंदेश्वर, सुशील पाऊलझगडे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)