शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक सत्कारपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:13 IST

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. यासाठी सत्कारमूर्तीना रितसर पत्र सुध्दा दिले जाते. मात्र सत्कारमूर्तीमध्ये समावेश असलेल्या एका शिक्षकाला जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सत्कारपासून वंचित राहावे लागले.

ठळक मुद्देनिमंत्रण देण्याचा पडला विसर : वरिष्ठ घेणार का दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. यासाठी सत्कारमूर्तीना रितसर पत्र सुध्दा दिले जाते. मात्र सत्कारमूर्तीमध्ये समावेश असलेल्या एका शिक्षकाला जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सत्कारपासून वंचित राहावे लागले.यंदा १५ आॅगस्टला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला. या सत्कारमूर्तीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्याही समावेश होता. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सत्कार असल्याचे अधिकृत पत्र न मिळाल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. विशेष म्हणजे सत्काराच्या वेळी त्यांच्या नावाचा नामोल्लेख करण्यात आला. मात्र ते उपस्थित नसल्याने पालकमंत्री बडोले सुध्दा आश्चर्यचकीत झाले. याबाबत लोकमत प्रतिनिधीने प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्याशी संर्पक साधला असता, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेे मला अद्यापही अधिकृत पत्र न मिळाल्याने मी कार्यक्रमाला जावू शकलो नाही. तरीही सत्कारमूर्तीमध्ये माझे नाव आहे हे मला समजले व सदर विभागातर्फे माझी निवड केली. याबद्दल मी शतश: आभारी आहे. माझ्या शैक्षणिक सेवेची दखल घेऊन सत्कारसाठी मला पात्र ठरविले हा सत्कार माझा नसून माझ्या संपूर्ण शिक्षक बांधवाचा आहे. शिक्षकांच्या सामूहिक परिश्रमामुळेच मला शैक्षणिक सुविधा करता आली व यशाचा टप्पा गाठता आल्याचे सांगितले.या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार सुध्दा पुढे आला आहे. या प्रकाराची दखल घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाºयांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.