शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

शिक्षक भारतीचे शिक्षक दिनीच धरणे आंदोलन

By admin | Updated: September 6, 2015 01:39 IST

विविध मागण्यांचा समावेश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

विविध मागण्यांचा समावेश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादरगोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना व माध्यमिक शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना वापरलेले अपमानजनक शब्द मागे घ्यावे, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मुळ नियुक्तीपासून ग्राह्य धरण्यात यावी, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, पहिली ते आठवीच्या मुलामुलींना शंभरटक्के मोफत गणवेश देण्यात यावे, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ नका, शिक्षणाचा हक्क साबूत ठेवा, सर्व विना अनुदानित शाळा महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान सुरू करा, सदोष संच मान्यता रद्द करा, आॅफलाईन पगार आॅनलाईन करा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या आॅनलाईन पटसंख्येचे निकष रद्द करा, स्पेशन स्कुल एमसीव्हीसी शिक्षकांना आॅनलाईन पगार सुरू करा, शिक्षक-शिक्षकेत्तर भरतीवरील बंदी उठवा, चिपळुनकर समिती लागू करा, कंत्राटीकरण/शिक्षण सेवक पद्धत बंद करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, सरलची डोकेदुखी बंद करा, डाटा एन्ट्री आऊटसोर्सिंग करा, रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व मोफत व्ह्या पुस्तके द्या, मुलींना ५ रुपये उपस्थिती भत्ता द्या, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरीय एकच रोष्टर असावे, शिक्षकांना एमएससीआयटी बंधनकारक करू नये, महिला शिक्षकांना केंद्राप्रमाणे संगोपन रजा द्या, डीटीएड पास अप्रशिक्षित शिक्षकांना त्वरित सहायक शिक्षकाचा आदेश देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पगार द्यावा, सर्व शिक्षकांचे १ मार्च २०१४ पासून थकबाकी वेतन देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला सत्र २०१४-१५ चे सादिलवार देण्यात यावे अशा विविध मागण्यांचा समावेश होता.या धरणे आंदोलनाला प्राथमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, सचिव प्रमेश बिसेन, कार्याध्यक्ष गुलाबराव मौदेकर, माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनेवाने, कार्याध्यक्ष राजेंद्र पटले, जिल्हासचिव जितेंद्र पटले, विभागीय उपाध्यक्ष भाऊराव पत्रे, संतोष बारेवार, आर.वाय. बारसे, आर.सी. टेंभरे, पी.एस. रहांगडाले, एस.बी. बिसेन, संतोष मेंढे, के.एफ. बहेकार, आर.पी. सोनवाने, ममता चुटे, नलिनी नागरिकर, आशा रहांगडाले, लक्ष्मीकांत विठ्ठले, प्रतिभा डोंगरे, आर.डी. पारधीकर, जे.जी. चक्रेल, नरेंद्र बांते, उतक्रांत उके, विलास डोंगरे, प्रफुल्ल ठाकरे,जि.प. सदस्य जियालाल पंधरे, एस. यू. वंजारी, मुख्याध्यापक शरद उपलपवार, डी.टी. कावळे, विरेद्र कटरे, हरिराम येळणे, के.जी. नागपुरे, संतोष कुसराम, वाय.के. सलामे, रामेश्वर बहेकार, एस.सी. हुड्डा, एस.टी. लिल्हारे, आर.एच. मात्रे, पी.बी. बरेकर, संजय बावनकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)