शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने, मोटारसायकल रॅली काढून दिला आंदोलनाला पाठींबा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने विरोधकांच्या विरोधानंतरही अन्यायकारक तीन कृषी विधेयक पारित केली. यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र हे आंदोलन सुध्दा दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.८) येथे केले. केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणाच्या विरोधात मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला महाविकास आघाडीने समर्थन दिले होते. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने सकाळी शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन, अमर वऱ्हाडे, जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेनेचे पंकज यादव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयूर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, निलम हलमारे, देवेंद्रनाथ चौबे, गोविंद तुरकर, पंकज यादव, आशा पाटील, शिवकुमार शर्मा, के.बी.चव्हान, केतन तुरकर, सौरभ रोकडे, सतीश देशमुख उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात आ.सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलFarmer strikeशेतकरी संप