शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:38 IST

केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी मोठी आश्वासने दिली.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : तिरोडा तालुक्यात प्रचार सभा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी मोठी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात यापैकी कुठल्याच आश्वासनाची पूर्तता केली नाही.जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा तालुक्यात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी. आ. दिलीप बन्सोड, माजी जि.प.उपाध्यक्ष रमेश पारधी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटेल, सचिव डॉ.योगेंद्र भगत, माजी. जि.प.उपाध्यक्ष पंचभाऊ बिसेन, रॉका महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, डॉ. अविनाश जायस्वाल, जि.प.सदस्य कैलास पटले, प.स.सदस्य किशोर पारधी, नत्थुलाल अंबुले, माया भगत, सरपंच समिक बन्सोड, अलकेश मिश्रा, इंदीेरा अंबुले उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले ही निवडणूक सर्व सामान्य जनता, विकासापासून वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे. सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करुन सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून देशात परिवर्तन आणण्याचे आवाहन केले. निवडणुकीत केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्याशिवाय या सरकारकडे काहीच नाही. त्यामुळे या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. माजी.आ.बन्सोड यांनी मागील चार वर्षांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकही मोठेही काम झाले नाही. सिंचन प्रकल्प मार्गी लागले नाही. उलट रोजगाराची समस्या निर्माण झाली असून जनतेला विविध समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी संधी असल्याचे सांगत आघाडीच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी सभेला संबोधित केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ खा.पटेल यांनी अर्जुनी, पालडोंगरीे, कवलेवाडा, मुंडीकोटा, नवेझरी, वडेगाव, सुकडी येथे सभा घेतल्या.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल