शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:51 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल यांची अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर,इटखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच यासर्व आश्वसनाचा भाजप सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.गोसेखुर्दसारखा महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प सुध्दा भाजप सरकारच्या काळात रखडला आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हितैशी असल्याचा दावा करणाºया भाजप सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसचे अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहीवले यांनी मागील पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला मतपेटीतून धडा शिकविण्यास सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019