गोंदिया : २०१३-१४ या आर्थिक वर्षात मागील वर्षाची थकबाकी व चालू आर्थिक वर्षाची थकबाकी व चालू आर्थिक वर्षाची मागणी असे एकूण ८ कोटी ५० लाख ५४ हजार ८१२ रुपये घरकर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा बराच प्रयत्न जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केला आहे. ७ कोटी २० हजार ६९० रुपयांचा कर वसुल करून ग्रामपंचायतींनी ८२.३२ इतकी लक्ष्यपूर्ती केली आहे. ही गोंदिया व तिरोडा नगर परिषदांसाठी चांगलीच चपराक ठरत आहे. गोंदिया नगर परिषद वसुलीचे ५० टक्केही उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरली असताना ग्रामपंचायत्ीाची ही आकडेवारी समाधानकारक असल्याचे मानले जात आहे. यावरुन शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक कराबाबत अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. एकीकडे जिल्ह्यातील नगर परिषदा करवसुलीत मागे पडत असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मात्र उद्दीष्ट गाठण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्नशील आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ग्रामपंचायतना ८ कोटी ५० लाख ५४ हजार ८१२ रुपयांचे गृहकर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात ३१ मार्च २०१३ ची १ कोटी ३१ लाख ९१ हजार १७ रुपयांची थकबाकीचा समावेश होता. यापैकी जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन तब्बल ७ कोटी २० हजार ६९० रुपयांचा कर वसुल केला. यात गोंदिया तालुक्यात २०१३-१४ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख ८७ हजार ४८६ रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने १२ कोटी ३९ हजार ८५६ रुपयांची गृहकर वसुली करण्यात आली असून याची टक्केवारी ८१.९७ इतकी आहे. तिरोडा तालुक्याला १ कोटी ६९ लाख ४३ हजार ७४३ रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने १ कोटी ३९ लाख ९२ हजार ५५१ रुपयांची गृहकर वसुली झाली असून टक्केवारी ८२.५८ इतकी आहे. आमगाव तालुक्याला १ कोटी ४५ लाख ५४ हजार ७२४ रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी १ कोटी २१ लाख ४५ हजार ९२० रुपये वसुली झाली असून टक्केवारी ८३.४५ इतकी आहे. सालेकसा तालुक्याला ५० लाख ३१ हजार ८६८ रुपयांचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ४० लाख ७१ हजार ७७६ रुपयांची करवसुली केली असून याची टक्केवारी ८०. ९१ इतकी आहे. देवरी तालुक्याला ७४ लाख ३ हजार २६२ रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी ६२ लाख २० हजार २९२ रुपयांची गृहकर वसुली करण्यात आली असून याची टक्केवारी ८४.०३ इतकी आहे. गोरेगाव तालुक्याला ६१ लाख ८७ हजार ४३९ रुपयांचे उद्दीष्ट तर ५० लाख ७३ हजार ६६८ रुपयांची करवसुली झाली असून टक्केवारी ८२ इतकी आहे. सडक अर्जुनी तालुक्याला ८८ लाख ५९ हजार ३४८ रुपयांचे उद्दीष्ट ७५ लाख ३० हजार ४४१ रुपयांची करवसुली असून टक्केवारी ८५ इतकी आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्याला १ कोटी १२ लाख ८६ हजार ९४३ रुपयांचे उद्दीष्ट दिले असून ८९ लाख ४६ हजार १८६ रुपयांची करवसुली करण्यात आली असून टक्केवारी ७८.५७ इतकी आहे. ग्रामपंचायतकडून आलेल्या समाधानकारक करवसुलीमुळे भविष्यात शासनाकडून येणार्या निधीलाही कोणताही अडसर राहणार नाही. यानिमित्ताने आगामी आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील विकासकामेही प्रभावीपणे होण्याची शक्यता आहे. एकीकडे नगर परिषदा करवसुलीच्या उद्दिष्टाच्या जवळपासही पोहोचत नसताना ग्रामपंचायतने केलेली ही करवसुली निश्चितच ग्र्रामीणभागतील नागरिकांच्या जागरुकतेचा परिचय देणारी आहे.
करवसुलीत ग्रामपंचायतींची आघाडी
By admin | Updated: May 10, 2014 00:18 IST