शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली अभियान टाय-टाय फिस्स...

By admin | Updated: January 17, 2015 23:00 IST

शनिवारपासून (दि.१७) सुरू होणारे पालिकेचे कर वसुली अभियान पुन्हा एकदा टाय-टाय फिस्स... झाले आहे. मुख्याधिकारी कामात व्यस्त असल्याने ही मोहीम पुन्हा रखडल्याचे सांगितले जात आहे.

गोंदिया : शनिवारपासून (दि.१७) सुरू होणारे पालिकेचे कर वसुली अभियान पुन्हा एकदा टाय-टाय फिस्स... झाले आहे. मुख्याधिकारी कामात व्यस्त असल्याने ही मोहीम पुन्हा रखडल्याचे सांगितले जात आहे. पालिकेच्या या उदासीन धोरणामुळे ११ कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट गाठणे दिवसागणिक कठीण होत आहे.मागील थकबाकी व चालू वर्षातील कर असे एकूण ११ कोटींची कर वसुली पालिकेला करायची आहे. मात्र कर वसुली विभागाकडून वसुली होत नसल्याने कर वसुलीचे डोंगर वाढतच चालले आहे. कर वसुली होत नसल्याने पालिकेला प्राप्त होणाऱ्या शासकीय अनुदानावर प्रभाव पडत असून शिवाय रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुद्धा सुटत नसल्याचे चित्र आहे. तर कर वसुलीच्या या गंभीर प्रश्नाला लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी खुद्द एक दिवस पालिकेत घालवून कर विभागातील कर्मचाऱ्यांची क्लास घेतली होती. यावर पालिकेने कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी करून कर वसुली सुरळीत करण्याचा विचार केला होता. त्यानुसार आमसभेत ठराव पारित करून कर वसुली अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीही करण्यात आली. मात्र पालिकेला अद्याप कर वसुली अधिकारी न मिळाल्याने कर वसुली विभाग पूर्णपणे मुख्याधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे. तर कर वसुली विभागातील हा लेटलतीफ कारभार लोकमतने वेळोवेळी उजेडात आणल्याने पालिका प्रशासनाने कर वसुली अभियान राबविण्याचे नियोजन केले. यासाठी पालिकेने सात सदस्यांचे कर वसुली पथक तयार केले आहे. हे पथक १६ जानेवारीपासून शहरात कर वसुली मोहिम राबविणार होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांची कार्यशाळा आल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी १६ तारखेची मोहिम रखडली व १७ जानेवारीपासून मोहीम राबविणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी सांगीतले. त्यानुसार १७ पासून कर वसुली अभियान राबविणे अपेक्षीत होते. मात्र मुख्याधिकारी उपलब्ध न होऊ शकल्याने हा दिवसही तसाच गेला व पुन्हा एकदा कर वसुली अभियान टाय-टाय फिस्स्स... झाल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)