शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीचे नियोजन शून्य

By admin | Updated: December 1, 2015 05:49 IST

यंदा पालिकेला ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट आहे. उरलेल्या चार महिन्यांत

गोंदिया : यंदा पालिकेला ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट आहे. उरलेल्या चार महिन्यांत पालिकेला हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असल्याने त्या दृष्टीने त्यांची तयारी अपेक्षित आहे. मात्र कर वसुली विभागाला संगणकीकरणाचे काम डोकेदुखीचे ठरत. आतापर्यंत डाटा दुरूस्तीचे काम सुरू असून बिलींग झालेली नाही. यातून कर वसुलीचे नियोजन शून्य दिसून येत असून हाच प्रकार त्यांना भोवणार यात शंका नाही. पालिकेला आजघडीला ५ कोटी ५१ लाख सात हजार ११६ रूपये थकीत ४ कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये चालू (सन २०१५-१६) अशाप्रकारे एकूण ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख ४ हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूण १ कोटी १४ लाख २० हजार १ रूपयांची वसुली केली आहे. येथे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीचे टार्गेट कमीच आहे. त्यात मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच कर वसुली विभागाची बैठक घेऊन त्यांना टार्गेट पूर्ण करण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांनी स्वत: मैदानात उतरणार असल्याचीही तयारी दर्शविल्याची माहिती आहे. आता कर वसुली विभागाकडे चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. या चार महिन्यांत विभागाला टार्गेट पूर्ण करायचे असल्याने त्यांची तयारी असली पाहिजे. मात्र कर वसुली विभाग आताही यासाठी सज्ज नसल्याचे दिसते. कारण कर वसुली विभागातील डाटा संगणकीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विभागातील सहायक कर निरीक्षक उपेंद्र धामनगे डाटा फिडींग झाली असून त्याची दुरूस्ती सुरू असल्याचे सांगत आहेत. यात एकाच वॉर्डाची दुरूस्ती झाल्याचेही त्यांच्याकडून कळले. अशात उर्वरित ३९ वॉर्डांचा डाटा दुरूस्त कधी होणार, त्यांचे बिलींग कधी होणार व कधी त्यांची वाटणी होणार असा प्रश्न येथे पडतो. यामुळे येथेच कर वसुली विभागाचा नियोजनशून्य कारभार पुढे येतो. कर वसुलीवरच पालिकेचा कारभार चालतो.शिवाय शासनाकडून येणाऱ्या अनुदानासाठी जास्तीत जास्त कर वसुली होणे गरजेचे आहे. येथे मात्र कर वसुली विभागच अद्याप तयार नसल्याने ऐन वेळी मात्र धांदली होणार यात शंका नाही. कर वसुलीसाठी विभागाचे नियोजन शून्य असल्याने याचा परिणाम कर वसुलीवर पडणार याची शक्यताही नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)बिलिंग अद्याप झालेली नाही४डाटा फिडिंगच्या कामाचे काय झाले ते विभागालाच ठाऊक. मात्र बिलिंग अद्याप एकाही वॉर्डाची झालेली नाही. आता जेमतेम एका वॉर्डातील डाटा दुरूस्ती झाली असल्याने उर्वरित ३९ वॉर्डांच्या डाटा दुरूस्तीला आणखी वेळ लागणार यात शंका नाही. मात्र या कामात चांगलीच लेटलतीफी झाली हे दिसूनच येत आहे. सर्व वॉर्डांच्या डाटातील दुरूस्ती झाल्यावरच सर्वांचे बिलिंग केले जाणार. मात्र याला किती वेळ लागणार हे सांगता येत नाही.