१४ तारखेपर्यंत मोहीम : जुन्या नोटांनी कर करण्याचे आवाहनगोंदिया : ५०० व १००० रूपयांच्या नोटाद्वारे कर भरण्याची मुभा देण्यात आल्यानंतर शहरवासीयांनी नगर पालिकेकडे ३३ लाख रूपयांचा कर जमा केला यात २२ लाख रूपये मालमत्ता कराचे असून ११ लाख रूपये बाजार कराचे आहेत. विशेष म्हणजे येत्या १४ तारखेपर्यंत कर भरण्यासाठी जुन्या नोटांना स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने कर भरणाच्या रकमेत आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली आहे. अशात महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने ५०० व १००० रूपयांच्या नोटा कर भरण्यासाठी स्वीकारण्याचे आदेश काढले. त्यानुसार नगर परिषदेने शुक्रवारी (दि.११) ५०० व १००० रूपयांच्या नोटा कर भरण्यासाठी स्वीकारल्या असता यात नगर परिषदेला ३३ लाखांची आवक झाली. यामध्ये मालमत्ता करापोटी नगर परिषदेला २२ लाख रूपये तर बाजार करातून ११ लाख रूपये मिळाले आहेत. नगर विकास विभागाच्या आदेशानंतर नगर परिषदेने शुक्रवारी (दि.११) ही विशेष सेवा दिली होती. मात्र जुन्या नोटा स्वीकारण्यास सोमवारपर्यंत (दि.१४) मुदतवाढ देण्यात आल्याने नगर परिषदेकडून आता सोमवारपर्यंत कर भरणासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. यात शुक्रवारी (दि.११) रात्री १२ वाजतापर्यंत नगर परिषदेत कर भरणा करण्याची सुविधा देण्यात आली होती. तर शनिवारी (दि.१२) व रविवारी (दि.१३) सकाळी ८ वाजतापासून रात्री ८ वाजतापर्यंत ही सुविधा दिली जाणार आहे. शिवाय सोमवारी (दि.१४) रात्री १२ वाजतापर्यंत कर भरण्याची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेच्या कर व कर निर्धारण विभागातील कर्मचारी कामावर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा नगर परिषदेची शहरवासीयांवर मालमत्ता करापोटी ५.५० कोटींची मागील थकबाकी असून ४.५० चालू मागणी अशा प्रकारे एकूण १० कोटींची थकबारी आहे. त्यात मात्र शासनाने ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्याने त्याचा फायदा नगर परिषदेला मिळाल्याचेही दिसून येत आहे. शुक्रवारी (दि.११) पालिकेला ३३ लाखांची आवक झाली असून येत्या तीन दिवसांत यात आणखीही भर पडणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कर भरणासाठी सुरू असलेल्या या मोहिमेबाबत प्रादेशिक उप संचालकांकडे (नागपूर व मुंबई) दर तासाला माहिती दिली जात आहे. शिवाय मोबाईलवरून त्यांच्यासोबत नगर परिषदेचे अधिकारी आहेत.(शहर प्रतिनिधी) जनजागृतीसाठी फिरताहेत आॅटोशहरवासीयांना कर भरण्यासाठी ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारल्या जात असल्याबाबत माहिती व्हावी. तसेच कर भरणाबाबत जनजागृतीसाठी नगर परिषदेकडून शहरात पाच पोंगे फिरविले जात आहेत. १४ तारखेपर्यंत या पोंग्यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती केली जाणार आहे. विशेष म्हणजे रविवारी (दि.१३) नगर परिषेदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.डी.मेश्राम, प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे व कर विभागाचे पथक शहरातील एक लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडे जाणार आहे. या भेटीत ते थकबाकीदारांना कर भरण्याबाबत आवाहन करणार आहेत. रात्री १२.१५ वाजता फाडली पावती नगर परिषदेने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली असताना शुक्रवारी (दि.११) नगर परिषद कार्यालयात थकबाकीदारांनी गर्दी केली होती. अशात पालिकेला ३३ लाखांची आवक झाली. यासाठी रात्री १२ वाजतापर्यंत पावती फाडण्याची सुविधा होती. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेतला व रात्री १२.१५ वाजता शहरातील एका व्यापाऱ्याने कर भरणा केला.
फक्त ३३ लाखांची करवसुली
By admin | Updated: November 13, 2016 01:09 IST