शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टार्गेट ९.३५ कोटी रूपयांच्या कर वसुलीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:26 IST

मालमत्ता कर वसुलीचा काळ जवळ येत असून नगर परिषदेचे टेंशनही वाढू लागले आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व यंदाची मागणी असे मिळून एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपयांचे टार्गेट आहे. असे असतानाच यंदा किमान ८० टक्के कर वसुलीचे निर्देश कर विभागाला देण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर परिषद कामाला लागली आहे.

ठळक मुद्देमालमत्ता कर वसुलीची तयारी : नगर परिषद लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मालमत्ता कर वसुलीचा काळ जवळ येत असून नगर परिषदेचे टेंशनही वाढू लागले आहे. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व यंदाची मागणी असे मिळून एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपयांचे टार्गेट आहे. असे असतानाच यंदा किमान ८० टक्के कर वसुलीचे निर्देश कर विभागाला देण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर परिषद कामाला लागली आहे.नगर परिषदेला सर्वात जड काम म्हणजे कर वसुलीचे आहे. भल्या भल्यांकडे मोठाली रक्कम थकून बसल्याने कर वसुली विभागाची डोकेदुखी वाढते. अशात यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी ४ कोटी ८६ लाख ६५ हजार ३१७ रूपये व चालू मागणी ४ कोटी ४८ लाख ७९ हजार १३१ रूपये असे एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे.यामुळे आतापासूनच कर विभागच काय नगर परिषदेचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे नगर परिषद आतापासूनच कर वसुलीच्या नियोजनासाठी कामाला लागली आहे.विशेष म्हणजे, कर वसुली विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील वर्षी नगर परिषदेला चांगलाच फटका सहन करावा लागला. मागील वर्षी नगर परिषदेला ९ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट होते. मात्र कर विभागाकडून फक्त ४ कोटी ४९ लाख ४६ हजार २०२ रूपयांची म्हणजेच फक्त ४८ टक्केच वसुली करण्यात आली होती. त्यामुळे यंदातरी मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई करता यावी यासाठी नगर परिषद आतापासूनच नियोजन करीत आहे.मोहरीलना दिले ८० टक्के कर वसुलीचे पत्रमागील वर्षी खूपच कमी कर वसुली झाल्याने नगर परिषद धास्तावली आहे. त्यामुळे यंदा नगर परिषदेने यंदा सर्व मोहरीलना ८० टक्के कर वसुलीबाबत पत्र दिले आहे. आतापासूनच नियोजन केल्यास हे शक्य असल्याने नगर परिषद कामाला लागली आहे. ८० टक्के कर वसुली न झाल्यास मोहरीलची दोन वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचेही पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कर वसुली वाढविण्यासाठी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा व वरिष्ठ लिपीक श्याम शेंडे यांना कर वसुलीची अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली आहे.वसुलीसाठी ८ जणांचे पथक गठितकर वसुलीसाठी नगर परिषद कर विभागाने आताच कर विभागातील ८ जणांचे पथक गठीत केले आहे. यात, सहायक कर निरीक्षक पी.के.खोब्रागडे, बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, वरिष्ठ लिपीक श्याम शेंडे, घोडेस्वार, संतबहादुर सोमवंशी, शेखर शर्मा, संजय चौबे, जगदीश गाते यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.