शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तालुक्यात सव्वा आठ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:59 IST

जे वृक्ष लावती सर्वकाळ ! त्यावरी छत्रच छललाळ! जे ईश्वरी अर्पिर्ती काळ ! नाना विश्व निर्मल!! संत ज्ञानेश्वर महाऊलीच्या या अभंगवाणीला आपले ब्रीद वाक्य बनवित गोंदिया वनविभागाने महाराष्टÑ शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या महा चळवळीत सहभाग दर्शवित जिल्ह्यात महावन महोत्सव साजरा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

ठळक मुद्दे७९० हेक्टर जमिनीवर एकूण ३४ रोपवन स्थळे : सर्वाधिक लागवड सालेकसा तालुक्यात

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ‘जे वृक्ष लावती सर्वकाळ ! त्यावरी छत्रच छललाळ! जे ईश्वरी अर्पिर्ती काळ ! नाना विश्व निर्मल!! संत ज्ञानेश्वर महाऊलीच्या या अभंगवाणीला आपले ब्रीद वाक्य बनवित गोंदिया वनविभागाने महाराष्टÑ शासनाचा ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या महा चळवळीत सहभाग दर्शवित जिल्ह्यात महावन महोत्सव साजरा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.या अंतर्गत सालेकसा तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले असून १ जुलैपासून तालुक्यात एकूण ८ लाख २२ हजार ८ वृक्षारोपण करण्यात येणार आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ च्या दरम्यान आयोजित महावन महोत्सव अंतर्गत सालेकसा तालुक्यात वन विभागातर्फे ५ लाख ८४ हजार ८, सामाजिक वनीकरण विभागातर्फे १ लाख २५ हजार आणि इतर सर्व यंत्रणा मिळून १ लाख १३ हजार वृक्षाची लागवड करण्यात येईल. तहसील कार्यालय पंचायत समिती, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व घटक यात शाळा महाविद्यालये, दवाखाने, ग्रामपंचायत, कृषी विभागातील संबंधित क्षेत्र शासकीय निम शासकीय व खासगी संस्थामार्फत सुद्धा वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. एकलव्य वन विभागाने ५ लाख ८४ हजार वृक्षारोपणाचा विळा उचलला आहे. तालुक्यात एकुण ३४ ठिकाणी रोपवन तयार करण्यात येणार आहे. एकूण ७९० हेक्टर जमिनीवर खड्डे खोदून वृक्ष लागवडीसाठी सज्ज करण्यात आलेले आहे. वन विभागाची यंत्रणा दिवसरात्र एक करीत वन महोत्सव मोहीम यशस्वी करण्याच्या दिेशेने काम करीत आहे. सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी अभिजीत ईलमकर यांच्या मार्गदर्शनात सर्व वन कर्मचारी आणि वन व्यवस्थापन समित्या तत्पर झाल्याचे चित्र आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व आपल्या ऋषी मुनींनी, संतानी अन पूर्व सुरीनी शेकडो वर्षापासून सांगितलेले आहे. आजघडीला आंतराष्टÑीय मापदंडानुसार किमान ३३ टक्के भूभागावर वनीकरण हे असायलाच हवे. प्रगतीशील मानल्या जाणाºया महाराष्टÑात मात्र हेच प्रमाण २० टक्के आहे.जागतिक तापमानात वाढ वातावरणातील बदल निसर्गाचे असंतुलन अनियमित पर्जन्यमान, दुष्काळ वा अतिवृष्टी अशा परिस्थितीला आज सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीची तीव्रता व परिणाम कमी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करुन महाराष्टÑाच्या सर्व जिल्ह्यात लोक सहभागातून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेतले आहे.या अंतर्गत सालेकसा तालुक्यात एकुण २० गावाच्या परिसरात ३४ ठिकाणी रोपवन तयार करण्यात येईल. यात रोंढा येथे १० हजार, कुलभट्टी-१ येथे २२ हजार २२०, कडोतीडोला येथे ११ हजार ११०, कोहडीटोला येथे १७ हजार ५००, दलदलकुही ३७ हजार ५००, कोसमसर्रा २५ हजार, जमाकुडो ३७ हजार ५००, भजियादंड ३७ हजार ५००, सोनपुरी १४ हजार ४४३, जमाकुडो-२ येथे १६ हजार ६६५, सिंधीटोला येथे ११ हजार ११०, कोसमतर्रा २ येथे २७ हजार ७७५, रामाटोला ११ हजार ११०, पांढरी १६ हजार ६६५, कुलरभट्टी-२ येथे ११ हजार ११०,दंडारी-१ येथे १५ हजार, मरकाखांदा १८ हजार, मक्काटोला १६ हजार २००, बिजेपार १८ हजार, दरेकसा ९ हजार, दंडारी-२९ हजार,सोनपुरी-२ येथे ३० हजार, कुलुरभट्टी-३ येथे १० हजार, साखरीटोला १२ हजार ४००, कुलरभट्टी-४ येथे ४ हजार ८००,दलदलकुही-२ येथे २६ हजार, मक्काटोला-२ येथे २६ हजार, मरकाखांदा-२ येथे १४ हजार, मरकाखांदा-३ येथे ४ हजार, कोपालगड येथे २ हजार ८००, बिजेपार-२ येथे २० हजार, दलदलकुही-३ येथे १० हजार, दरेकसा-२ येथे ११ हजार ६००, आणि कुलरभट्टी-५ येथे २० हजार रोपट्यांची लागवड करण्यात येईल.प्रत्येक रोपवन क्षेत्रासाठी समन्वय अधिकारीतालुक्यात वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाने योग्य नियोजन केले आहे. वृक्षारोपण करण्यात येणाºया प्रत्येक रोपवण क्षेत्रासाठी एका समन्वय अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याची सर्व जबाबदारी सुध्दा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अडीच लाख नैसर्गिक झाडांना संरक्षणवन विभागातर्फे तालुक्यातील जवळपास अडीच लाख रोपटे जी नैसर्गिकरित्या उगविली त्या झाडांना संरक्षित करुन त्यांना मोठे करण्यासाठी आवश्यक काळजी घेतली जाणार आहे. त्या झाडाभोवती बुडांना माती लावून सुरक्षेसाठी कुंपन लावण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच त्यांना वेळोवेळी खत पाणी घालून संगोपन आणि संवर्धन केले जाईल.वृक्षारोपण मोहिमेला लोक चळवळीचा स्वरुप देत यात प्रत्येक घटकाला समायोजित करण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, नोकरदार, शेतकरी आंिदंनी स्वयंस्फूर्तपणे वन महोत्सवात सहभागी व्हावे. वृक्षारोपण करण्यासाठी इच्छुकांनी वनविभागाशी संपर्क साधावा.-अभिजीत ईलमकरवन परिक्षेत्राधिकारी, सालेकसा