शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तंंटामुक्त गावे फक्त फलकापुरतीच सिमित

By admin | Updated: May 12, 2017 01:20 IST

गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी राज्य सरकारने १५ आॅगस्ट२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी राज्य सरकारने १५ आॅगस्ट२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केला. या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. राज्यात आतापर्यंत १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहेत. या प्रत्येक गावातील तंटामुक्त अभियानाचे फलक लोकांना प्रेरणादायी ठरत होते. आता तंटामुक्त गावातही वाद उदभवू लागले आहेत. राज्यातील प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे फलक दिसते. फलक लावल्याने गावाला प्रतिष्ठा मिळते. व मोहीमेला वृंध्दीगंत करण्याची प्रेरणा मिळते. हा उद्देश समोर ठेवून प्रचार प्रसिध्दीच्या रकमेतून फलक गावातील लोकांना प्रेरणादायी ठरावेत यासाठी गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त गाव समित्या जूने वाद मिटवून नवी वाद उदभवणार नाही याकडे विशेष लक्ष देते. समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित व्हावी, यासाठी राज्य सरकारने ही मोहीम अंमलात आणली. पुरस्कार प्राप्त गांवात तंटामुक्तीचे फलक गावाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, अश्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात फलक दर्शनिय स्थळी लावण्यात आले. या फलकांना लावण्यासाठी येणारा खर्च पुरस्काराच्या राशीतून करण्यात यावा असे सूचविण्यात आले. जिल्ह्यातील ५५६ गावे तंटामुक्त पुरस्कार प्राप्त आहेत. तंटामुक्ती तर्फे दारूबंदीचे प्रयत्न केले जात आहेत. तंटामुक्त मोहीम अंमलात आणण्यापुर्वी गावागावात दारूचा महापूर वाहायचा. तेव्हा दारुबंदी करण्यासाठी झटणाऱ्या महिलांना अपयश येत होते. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आल्याबरोबर गावागावातील दारूबंदी समितीला पाठबळ मिळाले. आता गावागावात अवैध दारूविक्रीला पायबंद घालण्यासाठी तंटामुक्तीचे प्रयत्न सुरू आहे. परंतु शासानाने परवानाप्राप्त दारू दुकाने बंद केल्याने अवैध दारू विक्री होत आहे.