गोरेगाव : महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या सभेत जिल्हाध्यक्ष घनश्याम पटले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोषाध्यक्ष प्राचार्य कुवरलाल वैद्य यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाची गोरेगाव तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
मराठी विषय शिक्षकांसाठी विविध चर्चासत्र, उद्बोधन वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करणे, मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने एस.एस. सी बोर्डाला सहकार्य करणे या उद्देशाने संघाचे गठण करण्यात आले आहे. तालुका कार्यकारिणीत अध्यक्षपदी महीपाल घोडमारे, कार्यवाहपदी देवराम मंडारे, गोवर्धन पटले, कोषाध्यक्षपदी टेकचंद ईळपाचे, उपाध्यक्षपदी सुनंदा तिरपुडे, सुधाकर भेलावे, सहकार्यवाहपदी भाऊ बंसोडे, सचिन राठोड, प्रसिद्धीप्रमुख म्हणून गजानन चंदीवाले, सदस्यपदी कल्पना राऊत, ओमेश्वरी ठाकरे, वैशाली जनबंधू, प्रकाश सोनकनवरे, जी. एच. जुमनाके यांची निवड करण्यात आली आहे.