शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सांभाळ हेच जीवन प्रवासाचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंदिया जिल्ह्याचा विकासासाठी कसलेही राजकारण आडकाठी येवू देत नाही. गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे माझे कुटुंब आहेत, अशीही ग्वाही खा. पटेल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याशी आपल कौटुंबिक नाते आहे. दोन्ही जिल्ह्यात राजकीय व सामाजिक कामे करताना अनेक चढ-उताराला समोर जावे लागले. मात्र, या जिल्ह्यातूनच मला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. मी कितीही शिखरावर असलो तरी माझ्या जीवन प्रवासात दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ खांद्यावर आहे. हे कधीही स्मरणात राहते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ जीवन प्रवासाचे गमक आहे, अशी स्पष्टोक्ती खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.राज्यसभेवर पुन्हा निर्वाचित झाल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल या आज (ता.११) गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यानिमित्त स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियम येथे २०० हून अधिक संस्था व संघटनातर्फे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. खा. पटेल पुढे म्हणाले, मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंदिया जिल्ह्याचा विकासासाठी कसलेही राजकारण आडकाठी येवू देत नाही. गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे माझे कुटुंब आहेत, अशीही ग्वाही खा. पटेल यांनी दिली.यावेळी मंचावर आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, अनिल बावणकर, शिवसेनेचे मुकेश शिवहरे, राजु कुथे, दामोदर अग्रवाल, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, खासदार पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यानंतर त्यांचे  शनिवारी आगमन झाल्यानंतर  गोरेगाव, सडक-अर्जुनी व तिरोडा येथेही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष व विविध    सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला. 

या संघटना व संस्थांनी केला सत्कार

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राईस मिलर्स असोसिएशन, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया, जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, संपादक संघ, लघु वृत्तपत्र संघ, गौरक्षण समिती, अग्रेसन समिती यासह २०० संघटना व संस्थांचा समावेश होता.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल