शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

13 पासून टेकऑफ, की पुन्हा तारीख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग केवळ मंत्री व काही विशेष व्यक्तींसाठी केला जात होता. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला विमानसेवेने जोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र दिलेल्या तारखांना टेकऑफ झालेच नाही. त्यातच आता खा. सुनील मेंढे यांनी बुधवारी १३ मार्चपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. मात्र यासंदर्भात बिरसी विमानतळ प्राधिकरणाला उड्डयन मंत्रालयाकडून अद्याप कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे १३ मार्चपासून टेकऑफ, की पुन्हा तारीख, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग केवळ मंत्री व काही विशेष व्यक्तींसाठी केला जात होता. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला विमानसेवेने जोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागूृन आहे, तर गोंदिया येथे रेल्वे जंक्शन सुध्दा आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाल्यास त्याची निश्चितच प्रवाशांना मदत होऊ शकते. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. ते प्रयत्न आता फळाला आले असून नोयडा येथील फ्लॉय बिग या कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेतले आहे, तर विमानतळ प्राधिकरणाने प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या आणि सुविधा देखील सुसज्ज केल्या आहेत. मात्र टेकऑफचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर जात आहे. आतापर्यंत टेकऑफच्या अनेक तारखा देण्यात आल्या, मात्र मुहूर्त काही साधला गेला नाही. त्यातच आता खा. सुनील मेंढे यांनी १३ मार्चचा नवीन मुहूर्त दिला आहे. तो तरी साध्य होतो की नाही, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. 

गोंदिया-इंदोर-हैदराबाद सेवा -  बिरसी विमानतळावरून पहिल्या टप्प्यात गोंदिया-इंदोर-हैदराबाद अशी विमानसेवा प्रारंभ करण्यात येणार आहे. सुरुवातीला     दोनच फेऱ्या होणार असून त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, तर भविष्यात गोंदिया-मुंबई आणि गोंदिया-पुणे विमान सेवा सुध्दा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

असे असेल वेळापत्रक- गोंदियाकरिता इंदोरवरून सकाळी ७.१५ ला विमान निघेल ८ वाजता गोंदियाला पोहोचेल. ८.२५ ला गोंदियावरून हैद्राबादकरिता निघेल. दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना व्हिलचेअरने नेण्याची व्यवस्था कुठल्या रस्त्याने असेल, रनवेपर्यंत बससेवा आणि अंतर किती असेल, प्रवासी कुठल्या गेटने आत येईल व बाहेर जाईल.

 उड्डाण सेवेचा लाभ- ज्या विमानतळावरून प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यात प्रवाशांना तिकीट कमी दरात (२०००-२२०० रुपये) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उड्डाण नावाची योजना सुरू केली. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया-इंदौर-हैदराबाद ते चेन्नईकरिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिडकी आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या २६ ते जानेवारीपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

 

टॅग्स :Airportविमानतळ