शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

घेतला कानाेसा, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब ? कळणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, यावर पुढील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे यावरून भाजपमध्ये अस्वस्थता कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. आता नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी १६ फेब्रुवारी निवडणूक होत आहे. यासाठी गुरुवारी (दि.१०) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तीन नगरपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे जाणून घेतली. मात्र, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले हे गुरुवारीच कळणार आहे. देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, यावर पुढील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे यावरून भाजपमध्ये अस्वस्थता कायम आहे. गुरुवारी या संदर्भात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतल्याची माहिती आहे, तर सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य असून, काँग्रेसचे २ आणि एका अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येथे नगराध्यक्षपदासाठी तेजराम मडावी, कामिनी कोवे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपदाला घेऊन नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुणाच्या नावावर शिक्कामाेर्तब करतात, हे गुरुवारी कळेल, तर अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेसचे ४ शिवसेना १ आणि अपक्ष १ आणि भाजपचे ७ सदस्य निवडून आले. त्यामुळे येथे खिचडी स्थिती असून, कुणाची सत्ता बनेल, हे अद्यापही निश्चित झाले नाही. मात्र, याला घेऊन बुधवारी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकी झाल्याची माहिती आहे. नेत्यांनी नगराध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावायची, या विषयावर कानोसा घेतला. मात्र, कुणाच्या नावावर शिक्कामाेर्तब होते हे गुरुवारीच कळेल. 

 असा निवडणूक कार्यक्रम- १० फेब्रुवारी : अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे.- १० फेब्रुवारी : नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व उमेदवारांची प्रसिद्ध करणे.- १४ फेब्रुवारी : अपिलावर सुनावणी, यादी प्रसिद्ध करणे.- १५ फेब्रुवारी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस.- १६ फेब्रुवारी : उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे.- १६ फेब्रुवारी : विशेष सभा घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड जाहीर करणे.

पद एक अन् इच्छुक अनेक - नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एका नावावर शिक्का मोर्तब करताना नेत्यांची सुद्धा तारांबळ उडत आहे. बुधवारी (दि.९) याच विषयाला घेऊन राजकीय बैठका सुरू होत्या. नगरसेवकात फूट पडण्याची शक्यता - पक्षाच्या तिकिटावर जरी नगरसेवक निवडून आले असले तरी पदाची लालसा सर्वांनाच आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाला घेऊन पक्षातच दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयाला घेऊन सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची सावध भूमिका घेतली असून नगरसेवकांवर बारीक नजर ठेवली आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक