शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:24 IST

संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाºयांवर देशद्रोही व एस. सी, एस.टी. अ‍ॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती, .....

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाºयांवर देशद्रोही व एस. सी, एस.टी. अ‍ॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचच्यावतीने राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे म्हणने ऐकूण घेतले. तसेच संबंधिताना निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले.या वेळी दिलेल्या निवेदनातून ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात स्वत:ला सवर्ण समजणाºया काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच आदर्श व्यक्तींबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा आहे. सदर समाजकंटकांनी सोशल मिडियावर या फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. राज्यघटनेने प्रत्येकाला समानसंधी देत न्याय अधिकार मिळवून दिले आहेत. जे विरोध करीत आहेत, त्यांनाही राज्यघटनेने सरंक्षण दिलेले असताना व राज्यघटना जाळणे हा देशद्रोह असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.शिष्टमंडळात ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, सुनीता हुमे, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, उपाध्यक्ष कैलाश भेलावे, शिशिर कटरे, श्रावण राणा, गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार, बहुजन एकता मंचचे सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर, संतोष वैद्य, शैलेष बहेकार, महेंद्र बिसेन, प्रेमलाल साठवणे, एम.बी. रहागंडाले, राजेश नागरीकर, लक्ष्मण नागपूरे उपस्थित होते.