शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारांच्या रोजगाराची उपाययोजना करा

By admin | Updated: June 20, 2017 00:58 IST

शासनाने गेल्या दोन वर्षात मासेमारीचे ठेकेच दिले नाही. त्यामुळे शासनाला या व्यवसायापासून मिळणारा महसूल....

सहसराम कोरोटे : शासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शासनाने गेल्या दोन वर्षात मासेमारीचे ठेकेच दिले नाही. त्यामुळे शासनाला या व्यवसायापासून मिळणारा महसूल तर बुडालाच शिवाय शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ११ हजार मासेमारांच्या हाताला कामही राहिले नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. शासनकर्त्यांनी जिल्ह्यातील ११ हजार मासेमारांच्या रोजगाराची उपाययोजना त्वरित करावी अशी रास्त मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहसराम कोरोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. पत्रकानुसार, जिल्ह्यात शेती व्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने सध्या विविध योजनांचा भडीमार केला आहे. यातच जिल्ह्यातील नद्या, तलाव व धरणांची संख्या पाहून मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न शासनाने मागील तीन वर्षापासून सुरू केले आहे. परंतु सद्यस्थितीत मत्स्य व्यवसायाची स्थिती निराशाजनक दिसून येत आहे. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरण व तलावातील मासेमारीसाठी मागील दोन वर्षापासून गतीमान शासनाने ठेक्यांना मंजुरी दिली नसल्याने मासेमारीतून निर्माण होणारा व्यवसाय शासनाच्या उत्पन्नावर पाणी फेरत आहे.जिल्ह्यात बहुतेक तलावाच्या अवैध मासेमारी व्यवसाय बळावला आहे. सोबतच अवैध मासेमारीवर नियंत्रण ठेवता येईल अशी यंत्रणाही शासनाकडे नाही. जुलै ते जून हा महिना मत्स्य व्यवसायासाठी ठेवण्याचा कालावधी असते. यात २०१६-१७ या वर्षात ठेकेच देण्यात आले नाही. याबाबतही यावर्षी शासनाकडून कोणतेही पाऊ ल उचलण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नवे ठेके दिले जातील की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. जिल्ह्यातील तलाव, नद्या व धरणांमध्ये मत्स्य व्यवसायीक मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र लघूपाटबंधारे विभागाच्या तलावांच्या निविदा प्रक्रियेवर स्टे आल्यामुळे हजारो मत्स्य व्यवसायी संकटात सापडलेले आहे. १६ मे २०१६ पासून काही कारणास्तव निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. तर दुसरीकडे काही तलावांचा ठेका ३० जून ला संपणार आहे. तेव्हा या तलावांची निविदा प्रक्रिया सुरू होते की नाही यात शंका आहे.गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यात मत्स्य पालनाच्या व्यवसायातून आर्थिक बळकटीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता मागील वर्षभर शासनाद्वारे मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या. परंतु मत्स्य व्यवसायाकांची सध्याची परिस्थिती पाहता कागदावरच शासनाच्या मासोळ्या तडफडत असल्याचे निराशाजनक चित्र दिसून येत आहे. अशा विविध कारणांमुळे तलावावर निविदा प्रक्रिया रखडल्याने हजारो मत्स्य व्यवसायी आर्थिक संकटात सापडले आहे. तरी शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे दोन वर्षात एकही तलावाचे ठेके दिले नाही. यात जर शासनाने निदान मासेमारीच्या जुन्याच परवान्यांचे नुतनीकरण केले असते आणि जे ठेके अस्तीत्वात आहेत ते पुढे चालू ठेवले असते तर जिल्ह्यातील हजारो मासेमारांना रोजगार मिळाला असता. यावर शासनकर्त्यांनी गांभीर्याने विचार करुन जिल्ह्यातील ११ हजार मासेमारांच्या रोजगाराचे उपाययोजना त्वरित करावी, अशी मागणी कोरोटे यांनी केली आहे.