शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छ बनविण्यासाठी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 11, 2015 02:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणून देशभर स्वच्छतेची मोहीम

राजकुमार बडोले : क्लिन इंडियाचा गोंदिया येथे शुभारंभ गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणून देशभर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. गोंदिया शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.आज ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, नगर परिषद गोंदिया व सेवाभावी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्लिन इंडियाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. गोंदिया येथील स्व.जमनालाल बजाज पुतळ्याजवळ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, नगर पालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहुरवाघ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.घनश्याम तुरकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, गोंदिया शहराला लागलेला अस्वच्छतेचा शिक्का या निमित्ताने मिटविता येईल. सर्वांच्या सहकार्याने शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. स्वच्छता असली तर आजार दूर पळतील. प्रत्येक आठवड्यात रविवारी वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येवून वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी काम करावे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.मनोहर म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कुल, एस.एस. गर्ल्स हायस्कुल व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक रॅली काढून अभियानात सहभाग घेतला. उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार, नगरसेवक, पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शाळा महाविद्यालयाचे शिक्षक यांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)