शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करा

By admin | Updated: September 26, 2015 01:54 IST

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना व कौटुंबीक अर्थसहाय्य योजनांचे अनेक प्रकरणे उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत.

अग्रवाल यांचे निर्देश : विविध योजनांचे प्रस्ताव प्रलंबितगोंदिया : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना व कौटुंबीक अर्थसहाय्य योजनांचे अनेक प्रकरणे उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. त्यावर सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आ.गोपालदास अग्रवाल यांनी दिले. यात तहसीलदार पवार यांनी विशेष लक्ष देवून वेळेवर कारवाई करावी, असे निर्देश दिले.बैठकीत तहसीलदार पवार यांनी सांगितले की, गोंदिया शहरातील आतापर्यंत मंजूर सर्व प्रकरणांत आॅगस्ट २०१५ पर्यंतच्या अनुदानाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. तसेच चालू महिन्याच्या वाटपाची कार्यवाही सुरू आहे. यावर्षी संजय गांधी योजनेचे ११०, श्रावणबाळ योजनेचे १८७, राष्ट्रीय कौटुंबीक अर्थसहाय्य योजनेचे १६ प्रकरणे प्राप्त झाले आहेत. असे एकूण ३१३ प्रकरणे आहेत. यापैकी २२७ प्रकरणे मंजूर, २२ नामंजूर व ६४ प्रकरणांवर कार्यवाही केली जात आहे. तसेच गोंदिया ग्रामीण परिसरातून सदर कालावधीत आलेल्या आवेदनांपैकी प्रलंबित संजय गांधी निराधारचे ४५, श्रावणबाळचे ५९, राष्ट्रीय कौटुंबीक अर्थसहाय योजनेचे २७ प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. याप्रसंगी आ. अग्रवाल यांनी पुढील महिन्यात नवरात्र व दिवाळी पर्व लक्षात घेवून सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा १५ दिवसांच्या आत करावयास सांगितले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी यांना आ. अग्रवाल यांनी कामठा येथे तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाबाबतही संपूर्ण माहिती घेवून समिक्षा केली. बैठकीत उपविभागीय अधिकारी केएनके राव, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष पृथ्वीपालसिंग गुलाटी, पं.स. सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमनलाल बिसेन, रजनी नागपुरे, गेंदलाल शरणागत, माजी न.प. सभापती सुनील भालेराव, शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक चौधरी, लोकेश रहांगडाले, आशा जैन, जगतराय बिसेन, न.प. सदस्य व्यंकट पाथरू यांच्यासह इतर समित्यांचे सदस्य, तालुक्यातील तलाठी व नायब तहसीलदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)