शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धम्म आचरणात आणा

By admin | Updated: January 24, 2017 02:07 IST

महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीच्या विकासाचा धम्म आहे. सम्राट

पालकमंत्री बडोले : भीमघाटावर अशोक स्तंभाचे भूमिपूजन गोंदिया : महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीच्या विकासाचा धम्म आहे. सम्राट अशोकांनी आपले संपूर्ण कुटूंब धम्माच्या प्रचारासाठी जगात पाठविले. थायलँड, जपान, श्रीलंका या देशात जावून बघितल्यावर खरा धम्म पाहायला मिळतो. फक्त स्मारक उभारल्याने धम्म मोठा होणार नाही तर तो आचरणात आणून आपण जगलो पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अशोक सर्वांगिण विकास सोसायटी, पुणेतर्फे १४ स्तंभ उभारणीच्या संकल्पनेतील आठव्या अशोक स्तंभाचा भूमिपूजन सोहळा रविवारी पांंगोळी येथील भीमघाटावर आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दि. २३ एप्रिल १९५४ ला गोंदिया येथे झालेल्या आगमनाचे औचित्य साधून हा स्मारक तयार होत आहे. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक शीलवन्त, डॉ.प्रशांत पगारे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, नगरसेवक घनश्याम पाणतावने, नविनर्वाचित नगरसेविका देविका रुसे, कुंदा पंचबुद्धे, विष्णू नागरिकर, झामसिंग येरणे, रतन वासनिक, महेंद्र कठाणे, श्याम चौरे, भदंत डॉ.तिस्सवंत, भदंत श्रद्धा बोधी, धनजंय वैद्य, बसंत गणवीर, राजू नोतानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.बडोले म्हणाले, कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या कार्यक्र मात अशोक शिलवंत यांच्याशी १३ स्तंभापैकी आपल्या जिल्ह्यातही अशोक स्तंभ व्हावा अशी चर्चा होवून आठव्या स्तंभासाठी भिमघाट हे ठिकाण निश्चित झाले. ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. याठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी असून ही पावन भूमी आहे. येणाऱ्या २३ एप्रिलाच या अशोक स्तंभाचे कार्य पूर्ण करून लोकार्पण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजचे जग हे आऊटसोर्सिंग व कॉर्पोरेटचे आहे. यात आरक्षण नसून यासाठी आपल्या युवावर्गाला तयार व्हावे लागेल असे ना.बडोले म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांनी ना.बडोले यांचे कौतुक करून पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाचे कार्य हे जनतेला कळत असल्याचे त्या म्हणाल्या. समाजातील युवकांनी आरक्षणाच्या मागे न लागता स्वकौशल्याने पुढे जाऊन समाजाचा विकास करून बाबासाहेबांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. संचालन धनंजन वैद्य व लक्ष्मीकांत डहाटे यांनी तर आभार श्याम चौरे यांनी मानले. कार्यक्रमात भिमगितांचा नजराना सादर करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)