शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत गाठा

By admin | Updated: July 9, 2015 01:30 IST

एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही.

गोंदिया : एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलिच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे. ही बाब फार लाजिरवाणी आहे. देशाला निर्मल करण्यासाठी ग्रामसेवकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याच्या वापरावर भर देऊन डिसेंबर अखेरपर्यंत नियोजित उद्दिष्ट गाठा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी केले.स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवार (दि.७) जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, वर्तमानात कार्य केले तर भविष्य चांगले होते. शासन आपल्याला सर्वकाही देते, याची जाणीव ठेवा. आपण ज्या लोकांसाठी कार्य करतो, ते आपले बांधवच आहेत. त्यामुळे जीव ओतून कार्य करा. नियोजित उद्दिष्ट साध्य करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी याप्रसंगी दिली. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील आठही पंचायत समिती अंतर्गत ३१ हजार ६२८ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट तथा कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या ग्रामपंचायतींमध्येसुद्धा वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम करता येते. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येतो. याप्रसंगी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ग्रामसेवकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट, आतापर्यंत पूर्ण झालेले बांधकाम तथा शिल्लक बांधकामाचे नियोजन सादर केले. केवळ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करूनच चालणार नाही, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. पूर्ण झालेल्या बांधकामाचे आॅनलाईन करण्याचे निर्देशसुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी याप्रसंगी दिले. दरम्यान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हटकर यांनी नियोजित कालावधीत शौचालयांचे बांधकाम करण्याची ग्वाही देवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ज्ञ, सल्लागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)