शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मतदार नोंदणीचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:33 IST

मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : १२८१ मतदान केंद्रावर मतदार नोंदणी कार्यक्र म

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील १२८१ मतदान केंद्रावर कार्यक्र म राबविण्यात येणार आहे. या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.मतदार नोंदणी संदर्भातील विशेष कार्यक्र मांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१) आयोजीत सर्व राजकीय पक्ष व निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती देताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी, दिव्यांग मतदारांना या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी विविध संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीत उपस्थित होते.बैठकीत यापूर्वी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेंतर्गत पात्र मतदारांसाठी मोहिम राबविण्यात आली होती.या मोहिमेंतर्गत ५ हजार ५५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज ३८५५, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज ५५८, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज १०३४ तथा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज १११ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना विशेष मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल. ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करु न घ्यावी. मतदारांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबत खात्री करणे गरजेचे असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.जरी ओळखपत्र मतदारांकडे असले तरी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. तेव्हाच मतदानाचा अधिकार मतदाराला प्राप्त होणार आहे. मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे शिबिरामध्ये उपलब्ध राहणार असून मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे असेही त्यांनी सांगीतले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी