शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय विमाछत्र योजनेचा लाभ घ्या

By admin | Updated: August 9, 2014 23:48 IST

उतारवयात वैद्यकिय सेवेची गरज लक्षात शासनाने ९ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकिय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील

गोंदिया : उतारवयात वैद्यकिय सेवेची गरज लक्षात शासनाने ९ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकिय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांकरिता वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू केली आहे. संबंधितांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी केले. शासनाची ही विमाछत्र योजना राबविण्याच्या उद्देशातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ८ आॅगस्ट रोजी आयोजित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा कोषागार अधिकारी दिंगबर नेमाडे, अप्पर कोषागार अधिकारी डॉ. अर्चना सोलंकी, उप कोषागार अधिकारी अ.उ.हुमणे व एम.डी.इंडिया हेल्थ केअर सर्व्हीसेसचे शाखा प्रमुख विनय गोसावी प्रामुख्याने उपस्थित होते. या योजनेची माहिती देताना कोषागार अधिकारी नेमाडे यांनी, शासकीय सेवेत कार्यरत अ,ब व क वर्गातील अधिकारी/कर्मचारी या योजनेत समाविष्ट असून शासकीय सेवेत कार्यरत अन्य कुणास या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास वार्षिक हप्ता भरून सहभागी होता येणार असल्याचे सांगीतले.तसेच या योजनेंतर्गत आंतररूग्ण म्हणून झालेला खर्च प्रतिपुर्तीसाठी अनुज्ञेय राहणार असून विमा पॉलिसीत नमुद ठराविक बाह्यरूग्ण उपचारांसाठीही विमाछत्र उपलब्ध राहणार आहे. संबंधितांना वैद्यकिय चाचणीची पूर्व अट राहणार नसून योजनेत समावेश करताना असलेल्या आजारांनाही पॉलिसीत नमूद केल्याप्रमाणे विमाछत्र राहणार असल्याचे सांगीतले. तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेले कोणतेही अधिकारी/कर्मचारी स्वेच्छेने या योजनेत आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सहभागी होऊ शकेल अशी माहिती दिली. तर अप्पर कोषागार अधिकारी अर्चना सोलंकी यांनी, या योजनेचा लाभ घेण्यास संबंधीतांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन केले. हुमणे यांनी, आंतररूग्ण उपचारांसाठी राज्यातील एक हजार २०० रूग्णालय नोंदणीकृत असून जिल्ह्यातील पाच रूग्णालयांचा यात समावेश असल्याची माहिती दिली. या रूग्णालयात कॅशलेस पद्धतीने उपचार घेण्याची सोय राहणार असून रूग्णालयात भर्ती झाल्यानंतर आगावू रक्कम भरावी लागणार नाही. तर रूग्णालयातील सर्व खर्च कंपनीकडून थेट रूग्णालयास प्रदान केला जाईल. तसेच पती व पत्नी दोघेही योजनेत स्वतंत्रपणे सहभागी झाल्यास त्यांच्या विमा हप्त्याच्या एकत्रित रकमेनुसार दोघांसाठी एकत्रित विमाछत्र अनुज्ञेय राहणार असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे गोसावी यांनी पावर पॉईंट प्रेजेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना योजनेबाबतची सविस्तर माहिती दिली. दरम्यान कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निराकरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. तर येथील कोषाघार अधिकारी कार्यालयात कार्यरत हि.डो.खांडेकर, अ.सु.दहिवले व एम.एच.टेंभरे हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचे प्रपत्र-ब कार्यशाळेतच भरून घेण्यात आले. या कार्यशाळेचे प्रास्तावीक कोषागार अधिकारी नेमाडे यांनी मांडले. तर उपस्थितांचे आभार अप्पर कोषागार अधिकारी अर्चना सोलंकी यांनी मानले. या कार्यशाळेला सुमारे १५० आहरण व संवितरण अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)