अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : कामठा येथे विस्तारित समाधान शिबिर खातिया : स्वर्ण जयंती महा राजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांचा लाभ देणे हे अभियानाचे मुख्य उद्देश आहे. प्रत्येकासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनांचा लाभ घ्या असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी केले. स्वर्ण जयंती महा राजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाच्यावतीने गुरूवारी (दि.२६) जवळील ग्राम कामठा येथे आयोजित विस्तारीत समाधान शिबीरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिबिराला उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे, विजय लोणारे, सरपंच कल्पना खरकाटे, कृषी अधिकारी वाहणे, पशु संवर्धन अधिकारी डॉ. इटानकर, मुख्याध्यापक एस.एच.तुरकर, बि.डी.ओ.वालकर, आदिवासी प्रकल्प अधिकारी कन्हाळे, उपसरपंच सुरजलाल खोटेले, नायब तहसीलदार एन.बी.पाटील, विजय पवार, एस.बी.माडी, संजय रामटेके, व्ही.डी.झाळे, पंचायत समिती सदस्य सुनिता दोनवडे, शंकर नारनवरे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्तावीक तहसीलदार पवार यांनी मांडले. शिबिरासाठी मंडळ अधिकारी ए.आर.कोरे, तलाठी आर.एस.बोडखे, विजय निमकर, व्ही.बी.डोंगरे यांच्यासह १६ गावांतील पोलीस पाटील व कोतवालांनी सहकार्य केले. (वार्ताहर)रोख अनुदान व साहित्य वाटप या शिबिरात राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत नऊ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे धनादेश, २६ लोकांना रेशनकार्ड, कृषी विभागांतर्गत ९० लाभार्थ्यांना पाईप अनुदान, सहा बीपीएल लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन, कृषी विभागातर्फे वॉटरपंप वितरित करण्यात आले. तसेच अधिवास प्रमाणपत्राचे २०५, जातीप्रमाणपत्राचे १९७ व संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे अर्ज स्वीकार करण्यात आले. शिवाय मोठ्या प्रमाणात लोकांचे आधारकार्ड तयार करण्यात आले व वारसान फेरफार करण्यात आले.
शासनाच्या योजनांचा लाभ घ्या
By admin | Updated: August 29, 2015 01:56 IST