शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष उपचार पद्धतीचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:35 IST

विदर्भ सिंधी महिला समिती व आयुष विभाग बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत बुधवारी स्थानिक सख्खर सिंधी भवनात आयुष शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देडॉ. हुबेकर : आरोग्य शिबिर, १३८ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भ सिंधी महिला समिती व आयुष विभाग बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत बुधवारी स्थानिक सख्खर सिंधी भवनात आयुष शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन संत श्री झुलेलाल व आयुर्वेद देवता धन्वंतरी यांच्या छायाचित्राचे पूजन व दीप प्रज्वलन करुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, विदर्भ सिंधी परिषदेचे डॉ. हरिष बजाज, आयुष विभागाच्या डॉ. गायत्री धाबेकर, डॉ.अर्चना चव्हाण, योगा मार्गदर्शक ममता बैस, पंचकर्म तंत्रज्ञ शबाना, पंचकर्म आयुर्वेद स्पेशालिस्ट डॉ. सोनवाने उपस्थित होते. या वेळी श्याम निमगडे यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या सर्व व्याधीवर आयुष उपचार पद्धती रामबाण आहे. राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत चिकित्सा व उच्च दर्जाची औषधी मोफत दिली जाते त्याचा लाभ घ्यावा. आयुष शिबिराच्या मार्गदर्शक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी जुनाट व्याधीवर सांधेदुखी, मधुमेह, अस्थमा आदिवर आयुर्वेदाचे उपचार चांगले प्रतिसाद देतात. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात मोफत चिकित्सा तज्ज्ञ उपलब्ध आहेत. याचा गोंदिया शहरातील महिलांनी लाभ घ्यावा असे सांगितले. पंचकर्म विशेष तज्ञ डॉ. सोनवणे यांनी या कॅम्पमध्ये स्पेशल पंचकर्म चिकित्सेद्वारे ८५ प्रौढ महिलांचे विविध जुनाट व्याधीवर शास्त्रक्त पद्धतीने उपचार केले. या वेळी सख्खर शीख पंचायत सभागृहात आयुर्वेद, होमयोपॅथी, युनानी औषधोपचार व योगाभ्यास यावर उपयुक्त अशी आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.त्याद्वारे योगा मार्गदर्शीका ममता बैस यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना चव्हाण यांनी महिलांच्या वंधत्व व मासिक धर्माच्या समस्यांवर होमिओ उपचार लाभकारक असल्याचे सांगितले. तसेच होमिओपॅथीबद्दल उपयुक्त माहिती दिली. या शिबिराचा १३८ रुग्णांनी लाभ घेतला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल