शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गैरकामांसाठी सरपंच व सचिव यांच्या निलंबनाची कारवाई करा

By admin | Updated: July 26, 2016 01:39 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी-केसलवाडा ग्रामपंचायत नेहमीच तालुक्यामध्ये आपल्या अनागोंदी कारभारासाठी चर्चेत असते.

आयुक्तांकडे तक्रार : कोदामेडी-केसलवाडा ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभारपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी-केसलवाडा ग्रामपंचायत नेहमीच तालुक्यामध्ये आपल्या अनागोंदी कारभारासाठी चर्चेत असते. अशाच अनियमित कामाला घेऊन कोदामेडी येथील सरपंच अनिता बडोले व सचिव एस.एस. लांजेवार यांची रितसर तक्रार कोदामेडी येथील नागरिकांनी थेट नागपूर विभागाचे आयुक्त यांना देऊन सरपंच व सचिवाला निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. सविस्तर असे की, कोदामेडी येथे डिसेंबर २०१५ ला समाजमंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. तसेच दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम जानेवारी २०१६ ला सुरू करण्यात आले. त्यासाठी निविदा रितसर काम सुरू करण्याच्या अगोदर काढणे अनिवार्य होते, परंतु निविदा फेब्रुवारी २०१६ ला काढण्यात आली होती. ज्या दिवसी निवदा मंजुरीची सभा घेण्यात आली होती, त्याच दिवशी सरपंचाने नोंदवहीमध्ये नोंदविले की, कामांमध्ये हस्तक्षेप नाही व पुढे अजून लिहितात की कामाचे बिल काढा. त्यामुळे निवदा मंजुरीच्या दिवशी बिल काढणे योग्य नाही. तसेच सचिव नोंदवहीमध्ये नोंदवितात की, या दोन्ही कामाची कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये नाही व या कामांचे टेंडरसुध्दा काढण्यात आले नाही. त्यामुळे मी बिल कोणत्या नियमात काढू, असे सूचवितात. सरपंच व सचिवाच्या अशा धोरणामुळे ग्रामपंचायतचे सदस्य निशांत राऊत, आनंदा झाडे, सुलोचना मुनिश्वर व प्रमिला मरस्कोल्हे यांनी संबंधित कामाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली होती.त्यानंतर एप्रिल महिन्याच्या मासीक सभेमध्ये दोन्ही कामाचे देयके काढण्याचे विषय विषयसूचीमध्ये घेण्यात आले. त्या महिन्याच्या नोंदवहीमध्येसुध्दा सचिव यांनी नोंदविले की, या कामाचे बिल नियमात बसत नाही व टेंडरसुध्दा काढण्यात आले नव्हते. त्यामुळे बिल देण्यात येत नाही. परंतु दोन महिन्यांच्या नोंदवहीमध्ये कामाच्या संदर्भात अनभिज्ञता दाखवूनसुध्दा सरपंच अनिता बडोले व सचिव एस.एस. लांजेवार यांनी मे २०१६ मध्ये कामाच्या देयकासंदर्भात विशेष सभा बोलावली. बहुमताच्या आधारे बिल काढण्यास सचिवानेसुध्दा सशर्त पाठिंबा दर्शविला. दोघांनी संगनमताने कोणत्या निकषाने बिल काढले, हे न उलघडणारे कोडे आहे. चार सदस्यांनी सूचविले की चौकशी झाल्यानंतर देयके काढावे, परंतु असे करण्यात आले नाही. त्यामुळे टेंडर न काढताच काम सुरू करणे, निविदेच्या दिवसीच बिलाची मागणी करणे अशा अनेक ठिकाणी सरपंचाने आपल्या पदाचा दुरूपयोग केला. तर सचिव हे पूर्वी कामाची जाणीव नाही व टेंडरसुध्दा नाही असे लिहितात व नंतर बिल कोणत्या नियमात काढतात, हेच कळत नाही. विशेष म्हणजे कोदामेडी येथील ग्रामसेवक एस.एस. लांजेवार अजूनही कंत्राटी ग्रामसेवक असून ते स्थायी ग्रामसेवक नाहीत. याआधी भ्रष्टाचारामुळे त्या स्थायी झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा वारंवार भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवकाची जिल्हा परिषदेला गरज काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. अशा ग्रा.पं. संदर्भातील विषयाला घेवून जिल्हास्तरावर न्याय न मिळाल्याने ग्रा.पं. सदस्य निशांत राऊत व इतर तीन सदस्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना तक्रार देवून कामाची चौकशी करण्यात यावी तसेच सरपंच व सचिव यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)