देवरी : मुंबई, दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाची वास्तू ही आंबेडकर चळवळीतील एक ऐतिहासिक वस्तू असून आंबेडकरी जनतेसाठी महत्वाचे ठिकाण होते. मात्र ही वास्तू पाडण्यात आली. त्यातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे येथील बहुजन रिपब्लिक सोसालिस्ट पार्टीच्यावतीने तहसीलदार संजय नागतिलक यांच्याकडे करण्यात आली. संपूर्ण देशात बाबासाहेबांची १२५ वी जतंती उत्साहात साजरी होत असताना भवन पाडणे ही आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळणारी कृती आहे याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. योग्य न्याय न मिळाल्यास पक्षाच्यावतीने भविष्यात संपूर्ण तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. (वार्ताहर)
आंबेडकर भवन पाडणाऱ्या दोषींवर कारवाई करा
By admin | Updated: July 15, 2016 02:10 IST