शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ताई, बाई, अक्काच लावणार धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:49 IST

‘ताई,बाई, अक्का विचार करा पक्का...’ हे घोषवाक्य निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वापरले जाते. मात्र जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत हे घोषवाक्य तंतोतंत लागू होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देमहिला मतदारांची संख्या अधिक : यंदा १३ हजार ५९३ मतदार वाढले

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘ताई,बाई, अक्का विचार करा पक्का...’ हे घोषवाक्य निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वापरले जाते. मात्र जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत हे घोषवाक्य तंतोतंत लागू होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ५ लाख ४० हजार २२० महिला मतदारांची संख्या असून नवीन मतदार यादीनुसार १३ हजार ५९३ महिला मतदारांची संख्या वाढली आहे.लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे. यातूनच जिल्ह्याची नवीन मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आता जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ मतदार आहेत. यात ५ लाख ३५ हजार ७१५ पुरूष तर ५ लाख ४० हजार २२० महिला व १ अन्य मतदारांचा समावेश आहे. नवीन मतदार यादीनुसार जिल्ह्यात ४ हजार ५०५ महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांच्या संख्येने अधिक आहे. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना महिला मतदारांना जास्तीत जास्त आकर्षीत करणे गरजेचे झाले आहे.विशेष म्हणजे, मागील मतदार यादीनुसारही जिल्ह्यात महिला मतदारांचीच संख्या अधिक होती. तर मागील मतदार यादीनुसार, जिल्ह्यात १० लाख ५० हजार २६१ मतदार होते. यात ५ लाख २३ हजार ६३५ पुरूष तर ५ लाख २६ हजार ६२४ महिला व २ अन्य मतदारांचा समावेश होता. म्हणजेच, मागील यादीतही २ हजार ९८९ महिला मतदारा पुरूष मतदारांच्या तुलनेत जास्त होत्या. एकंदर, ३१ जानेवारी २०१९ च्या नवीन मतदार यादीनुसार, जिल्ह्यात २५ हजार ६७५ मतदारांची वाढ झाली आहे. यात १२ हजार ८० पुरूष, १३ हजार ५९६ महिला मतदारांची वाढ झाली आहे. मात्र अन्य मतदारांत १ घटला असून यंदा फक्त १ अन्य मतदाराची नोंद करण्यात आली आहे.यावरून निवडणुकीतील उमेदवारांना महिला मतदारांकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे असणार आहे. महिलांची संख्या जास्त असल्याने उमेदवारांना तारण्यासाठी त्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळेच ‘ताई, बाई, अक्काच उमेदवाराला धक्का देऊन पुढे विजयाचा मार्ग मोकळा करणार असे म्हणणे वागवे होणार नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक