शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना मिळणार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:26 IST

तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.

ठळक मुद्देवसाहतीच्या विकासासाठी ८८ लाखांचा निधी : अनेक वर्षांनंतर समस्या मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.ग्राम तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नाथजोगींच्या वसाहतीचा विकास आणि त्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी. आ. अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल राज्य सरकारने २८ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वसाहतीच्या विकासासाठी ८८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून २० नाथजोगी कुटुंबांना घरकुल तयार करुन देण्यात येणार आहे. तसेच समाजभवन, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात येणार आहे.शासनाने पहिल्या टप्प्यात २० घरकुल बांधकामांना मंजुरी दिली असून दुसºया टप्प्यात उर्वरित कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. तांडा येथील नाथजोगी वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पायाभूत सोयी सुविधांचा अभाव होता. याचीच दखल आ.अग्रवाल यांनी त्यांच्या वसाहतीत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.या वसाहतीतील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत घरकुल, पाणी पुरवठ्याची सुविधा, वीज, पक्के रस्ते आधी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी नाथजोगी कुटुंबांना ५ गुंठे जमिनीची व्यवस्था करावी लागणार होती. मात्र ही अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती.अखेर ती अट सुध्दा रद्द करण्यात आली. यापुढेही नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी कठिबध्द राहणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. नाथजोगी वसाहतीसाठी व घरकुलासाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आ.गोपालदास अग्रवाल यांचे संतोष तांबू, सरपंच रविंद्र पंधरे व निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, उत्तम खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल