शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

घरकुल लाभार्थ्याच्या नावावर पैशाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:56 IST

घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतिरोडा तालुक्यात घरकुल योजनेत घोळ : माहितीच्या अधिकारात उघड : लाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, खोटे फोटो केले अपलोड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्याच्या नावावर या पैशाची उचल करण्यात आली त्यांनी यासंबंधीचे कागदपत्रे माहितीच्या अधिकारांतर्गत मागविल्यानंतर हा प्रकार उघकडकीस आला आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील घोळाचे मोठे बिंग फुटण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथील बेगनबाई सेवकराम रहांगडाले यांना पंचायत समिती अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचा नोंदणी क्रमांक एमएच २२०१५९१ हा आहे. ज्यावर्षी त्यांना घरकुल मंजूर झाले त्यावेळेस फाईल तयार करायची आहे असे सांगून ग्रामपंचायतच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने त्यांच्याकडून आधारकार्ड, बँक पास बुक, घर टॅक्स पावती तसेच इतर कागदपत्रे घेवून गेला.त्यानंतर बेगनबाई आणि तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला याबाबत वांरवार विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले.त्यामुळे लोकचंदने तिरोडा येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली. तेव्हा त्यांना तुमच्या आईच्या नावाने घरकुल बांधकाम झाले असून त्यासाठी ५ ट्रॅक्टर रेतीच्या रॉयल्टीची नोंद असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ही माहिती ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी याची अधिक खोलात जावून चौकशी केली असता त्यांच्या नावावर घरकुल बांधकामासाठी तीन वेळा एकूण ९० हजार रुपयांची उचल करण्यात आली असल्याचे आढळले.सदर पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नसून दुसºयाच व्यक्तीच्या नावावर जमा करुन उचल करण्यात आली. तसेच मस्टर क्रमांक ५८०७, ६४८२, ८४७३ व्दारे अकुशलची रक्कम १२ हजार ५८६ रुपये सही करुन काढण्यात आली.अशा प्रकारे त्यांच्या नावावर एकूण १ लाख २ हजार ५८६ रुपयांची उचल करण्यात आली.विशेष म्हणजे बेगनबाई यांनी घरकुलाचे बांधकाम केले नसताना त्यांच्या नावावर बांधकाम केल्याचे दाखवून खोटी स्वाक्षरी करुन पैशाची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुल बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बराच घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.बांधकामाचे खोटे फोटो अपलोडबेगनबाई रहांगडाले यांच्या नावावर घरकुल बांधकाम केल्याचे दाखवून पैशाची उचल करण्यात आली. तसेच बांधकाम झाल्याचे खोटे फोटो सुध्दा शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करुन शासनाची सुध्दा दिशाभूल संबंधित पदाधिकाऱ्यांने केली आहे. हा प्रकार बेगनबाई रहांगडाले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची जिल्हाधिकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल कराडब्बेटोला येथील बेगनबाई रहांगडाले या घरकुल लाभार्थ्याची दिशाभूल करुन त्यांच्या नावावर पैशाची उचल करणाऱ्या संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांच्या नावावर उचल करण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी. अन्यथा याविरुध्द न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा बेगनबाई व तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी दिला आहे.मोठा घोळ पुढे येण्याची शक्यतातिरोडा तालुक्यात घरकुल योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. तसेच बेगनबाई रहांगडाले सारख्या अनेक लाभार्थ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठा घोळ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.