शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची शेवटच्या दिवशी झुंबड

By admin | Updated: June 16, 2015 00:47 IST

जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १०६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी सोमवारी...

जि.प.-पं.स. निवडणूक : नामांकनाचा आकडा रात्रीपर्यंत गुलदस्त्यात, आॅनलाईनमुळे प्रशासनाची भंबेरीगोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १०६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी एकच झुंबड केली. आॅनलाईन नामांकन दाखल केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंट कॉपी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यासाठी ठिकठिकाणच्या उपविभागीय कार्यालयात आणि तहसील कार्यालयात गर्दी उसळली होती. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत किती लोकांनी नामांकन दाखल केले याचा आकडा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता.नामांकनपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.१५) शेवटची तारीख होती. रविवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १९७, तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी २६८ नामांकन दाखल झाले होते. सोमवारी त्यात किती नामांकनांची भर पडली हे रात्रीपर्यंत कळू शकले नाही. सोमवारी आॅनलाईन नामांकनात गोंदिया व सडक अर्जुनी येथे गडबडी झाल्यामुळे अंतिम आकडा काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत होती. यातूनच अनेकांचे नामांकन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसात सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष सर्व जागी आपले उमेदवार उभे करणार असल्यामुळे यावेळी निवडणुकीतील रंगत वाढणार असून बहुकोणिय संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच पक्षाची तिकीट न मिळाल्याने असंतुष्ट उमेदवारांकडून बंडखोरीही होणार आहे. अदलाबदलीच्या राजकारणात एकमेकांचे उमेदवार पळविणे सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)निरीक्षक देणार मतदान केंद्रांना भेटीनिवडणूक आयोगाने जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१५ करिता निवड केलेले निवडणूक निरीक्षक संबंधित तालुक्यातील मतदान केंद्र व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला भेटी देणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व उमेदवार दिनांक १६, २१, २२, ३० जून व २ जुलै रोजी त्यांच्या भेटीच्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.निवडणूक निरीक्षक यांचे नाव व पदनाम, त्यांच्या भेटीचे ठिकाण, भेट देण्यात येणार असलेले तालुके व भेटीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. उपायुक्त (करमणूक) मनोज सूर्यवंशी यांच्याशी नागरिकांनी भेटण्याचे ठिकाण हिमगिरी (विश्रामगृह गोंदिया) असून ते गोरेगाव व आमगाव तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील. उपायुक्त (पुनर्वसन) एम.ए.एच.खान यांचेशी शासकीय विश्रामगृह सा.बां. देवरी येथे भेट घेता येईल. ते सालेकसा व देवरी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन देसाई यांचेशी नागरिक नवेगावबांध येथील विश्रामगृह (वन्यजीव) येथे भेट घेवू शकतील. ते सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मतदान केंद्राना भेट देतील आणि सहायक आयुक्त (उद्योग) विकास जैन यांची अदानी विश्रामगृह तिरोडा येथे नागरिक भेट घेवू शकतील व ते गोंदिया व तिरोडा तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.