शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेत विविध शाळांचे सुयश

By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST

नुकताच दहावीचा निकाल शिक्षण बोर्डाने जाहीर केलेला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश प्राप्त केलेले आहे.

गोंदिया : नुकताच दहावीचा निकाल शिक्षण बोर्डाने जाहीर केलेला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश प्राप्त केलेले आहे.सुदामा हायस्कूल नागरामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नागरा येथील सुदामा हायस्कूलचा निकाल ८५ टक्के लागला. गीतेश राजेश उदापुरे या विद्यार्थ्याने ९०.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर शैलेश टेकेराम चिखलोंडे व खुशबूू शामलाल चिखलोंडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ८९.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच १५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा अधिक गुण घेवून सुयश मिळविले. जि.प. हायस्कूल गांगलातिरोडा तालुक्यातील गांगला येथील जि.प. शाळेचा निकाल ९४.११ टक्के लागला. गांगला केंद्रावरून एकूण २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात गांगला शाळेच्या ५९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी गांगला जि.प. शाळेचा विद्यार्थी नागेश्वर हिरालाल बिसेन याने ८७.६० टक्के गुण घेवून केंद्रातून प्रथम क्रमांक पटकाविला. विशाल रमेश बिसेन याने ८३.६० टक्के घेवून द्वितीय तर शुभम राजेश ठवकर याने निशा पूरण डाहारे यांनी ७७ टक्के गुण घेवून तृतीत क्रमांक पटकाविले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदियायेथील गुजराती नॅशनल हायस्कूलचा दहाव्या वर्गाचा निकाल ९८.२० टक्के लागला. इंग्रजी माध्यमातील एकूण ५९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. तर अर्ध इंग्रजी माध्यमाचा निकाला ९७.७७ टक्के लागला. यातील एकूण १७९ विद्यार्थ्यांपैकी १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.गुजराती नॅशनल हायस्कूलचे एकूण २३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी प्राविण्य श्रेणीत १४३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ६२ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ आहे.नेहा झानेश पशिने व पवन रूमेश्वर रहांगडाले या विद्यार्थ्यांनी ९५.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला. अभिप्राय प्रमोद रामटेके ९५.२० टक्के गुण घेवून द्वितीय तर अथर्व मदन चुटे याने ९५ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, सचिव हरिहर पटेल, दीपम पटेल, डॉ. नवीन शाह, जयेश पटेल, जयंत जसानी, अजय वडेरा, मुख्याध्यापक व्ही.एम. चव्हाण, पदाधिकारी व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.गर्ल्स हायस्कूल गोंदियास्थानिक एस.एस. अग्रवाल म्युनिसीपल गर्ल्स हायस्कूलचा दहाव्या वर्गाचा निकाल ८० टक्के लागला. येथील ४५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात लीना मधू शेंडे या विद्यार्थिनीने ९१.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर वर्षा प्रविणकुमार दुबे व अश्विनी काशिनाथ बेलगे यांनी अनुक्रमे ८२.२० टक्के व ८२ टक्के गुण घेवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले.मनोहर म्युनिसीपल गोंदियामार्च २०१४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत स्थानिक मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी शाळेचा निकाल ८३ टक्के लागला. शाळेतून ११ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात गौरी नरेंद्र शनवारे (९१ टक्के), धनश्री जयंतराव अडगुलवार (८४ टक्के), वर्षा ओंकार बन्सोड (८४ टक्के), श्रेया मिलिंदकुमार टेंभुर्णीकर (८४ टक्के), चंद्रकांत प्रभुदास पालांदूरकर (८३ टक्के), सावित्री गणेशचंद्र नागपुरे (८३ टक्के), प्रतिक दिलीप बनकर (८३ टक्के), राजेश ईश्वरदास खुटमोडे (८२ टक्के), अपराजिता दिलीप डवरे (८२ टक्के), निखील पांडुरंग पिल्लारे (८१ टक्के) व प्रज्ञा अनिल डोंगरे (८१ टक्के) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नगराध्यष सुशीला भालेराव, मुख्याधिकारी सुमंत मोरे, मुख्याध्यापक यु.पी. राजनकर, एन.एन. गणवीर, पर्यवेक्षक आर.एस. धाबर्डे व सर्व शिक्षकांनी कौतुक केले. साकेत पब्लिक शाळा गोंदियामहाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाद्वारे मार्च २०१४ मध्ये दहाव्या वर्गाची परीक्षा घेण्यात आली. यात मागील वर्षाप्रमाणे गोंदियाच्या अवधूत शिक्षण संस्थेद्वारे संचालित साकेत पब्लिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला. यात कमल बचवानी या विद्यार्थ्याने ८२.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच हरगुणदास भागवानी, सिमरन भक्तानी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ७८.४० टक्के व ७७ टक्के गुण मिळवून सुयश मिळविले. विशेष म्हणजे सिमरन भक्तानी या विद्यार्थिनीने गणितामध्ये ९७ गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक चेतन बजाज व प्राचार्य जितेंद्र तलरेजा यांनी त्यांचे कौतुक केले.नवोदय हायस्कूल केशोरीअर्जनी/मोरगाव तालुक्यातील केशोरीच्या नवोदय हायस्कूलचा निकाल ९२.७३ टक्के लागला. एकूण ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सागर ओमप्रकाश जांभूळकर या विद्यार्थ्याने ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच हिमकन्या भाष्कर आरसोडे (८५.२० टक्के), जयेंद्र राधेश्याम साखरे (८३.४० टक्के), अमोल ओमप्रकाश लोथे (८३ टक्के), रोहीत कार्तिक गाईन (८१.४० टक्के) व तनुश्री सुमेंद्र सरकार (८१.२० टक्के) गुण घेवून सुयश मिळविले. त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य ए.एल. हलमारे, पर्यवेक्षक एन.एस. काटगाये, एच.बी. साखरे, एम.ए. पाऊलझगडे, आर.एम. मारबते, नरेंद्र गोस्वामी व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. जीईएस शाळा रावणवाडी रावणवाडी येथील जीईएस हायस्कूलच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला. यात अभिषेक जयकुमार शेंडे या विद्यार्थ्याने ८५ टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. मागील पाच वर्षापासून या विद्यालयाने आपली गुणवत्ता कायम ठेवली आहे. विद्यालयातून विद्या बिसेन (८१.४० टक्के), अंकिता बिसेन (७६.८०टक्के), बादल हरिणखेडे (७६.४० टक्के), दीप्ती पटले (७३.६० टक्के), शिवशंकर भगत (७३.४० टक्के), संजू नागपुरे (७२ टक्के), प्रतिक पटले (७२ टक्के), बबिता बावणकर (७०.६० टक्के), पंकज हरिणखेडे (७० टक्के) गुण घेवून सुयश मिळविले. त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डी.एम. वासनिक, प्रा. एच.एच. पारधी आदिनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)